श्रीरामपूर/ प्रतिनिधी:
श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगांव इंदिरानगर येथील तुळजाभवानी मंदिरात सोमवारी पहाटे ३ चे सुमारास मंदिराची दानपेटी फोडून त्यातील सर्व रक्कम आदी चोरून नेले आहे.त्याचप्रमाणे तुळजाभवानी मूर्तीवरील दागिने प्रथम काढण्यात आले.त्या आधी मंदिराचे दार उघडण्याचा प्रयत्न झाला पण दार उघडता न आल्याने मंदिराच्या मागील बाजूस वर असलेल्या दोन खिडक्यापैकी उजव्या बाजूच्या खिडकीवरील प्लास्टिक कागद बाजूला करून दोन चोरापैकी एका चोराने खिडकीतून मंदिरात प्रवेश केला व चोरी केल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून दिसते.आषाढ महिन्यात भरपूर पैसे,देवीला दागिने दान देण्यात आले होते.चोरी झाल्यावर कपौंडच्या बाजूने रस्त्याने गेले.घटनेची तातडीने शहर पोलिसाना आकाश मैड प्रदीप जायभाय,नाना तोडमल आदींनी माहिती दिल्यावर पोलीस उप अधीक्षक शिवपुंजे पोलीस कॉ कांबळे, गायकवाड, परदेशी,किरण यांनी घटनास्थळी भेट दिली व या ठिकाणी श्वानपथक बोलाविण्यात आले आहे.
चोरांचा तपास लवकरच लावला जाईल असे आश्वासन पोलीस अधिकारी यांनी दिले.यापूर्वी तीन महिन्यापूर्वी एकदा मंदिराची चोरी झाली झाली होती त्याचा पोलीस विभागाकडून अद्याप तपास न लागल्याने येथील भाविकांमध्ये असंतोष पसरला आहे.पोलिसांनी या ठिकाणी सांगावे की काय तपास केला.किती आरोपी पकडले.या घटनेचा तरी तपास लागेल काय?असा प्रश्न भाविकांना पडला आहे.सीसीटीव्ही असून तपासात प्रगती नाही हे विशेष.तेथील भाविक सतत लोकवर्गणीतून कार्य करतात.या घटनेचा तपास तातडीने करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
वृत्त विशेष सहयोग, ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे, शिरसगांव, संकलन- समता न्यूज सर्व्हिसेस,श्रीरामपूर - ९५६११७४१११