shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

जीवन ख्रिस्तमय होण्यासाठी ख्रिस्तवचने कुटुंबात आवश्यक- फा.विल्सन


हरिगांव मतमाउली यात्रापूर्व
 सहावा शनिवार नोव्हेना संपन्न

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
तालुक्यातील हरिगांव येथील मतमाउली चर्चमध्ये मतमाउली यात्रापूर्व सहावा शनिवार नोव्हेना (भक्ती) संपन्न झाला. याप्रसंगी आपल्या प्रमुख प्रवचनात फार विल्सन यांनी सांगितले की,मानवानी आज्ञाभांगाचे पहिले पाप करून देवाशी असलेले आपले सार्वकालीन नाते तोडून टाकले. म्हणून या पापामुळे मरण जगामध्ये आले. माणूस मरणाला घाबरू लागला. मरणामुळे मानवी जीवनाला मर्यादा आल्या. देवाला आपले मानवावरील प्रेम कमी करता आले नाही. देवाने मानवाला अनंत काळचे जीवन देण्यासाठी सार्वकालीन योजना निर्माण केली. आणि या योजनेमध्ये पवित्र मरीयेला सर्वात महत्वाची भूमिका दिली. हीच ती कराराचा कोष, या जुन्या करारामध्ये कराराचा कोश हा फार महत्वाचा होता. त्याचप्रमाणे पवित्र मरिया प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या उदरात घेऊन नवीन करारातील कराराचा कोष झाली. तिने आपल्या पुत्राचा भार वाहिला.आणि याच पुत्राने आपल्या पापांसाठी आपल्या मुक्तीसाठी वधस्तंभाचा भार वाहिला. म्हणून पवित्र मरीयेचा देवाने फार मोठा सन्मान केला. तिला शरीरासकट देवाने स्वर्गात नेले.आज ती जबाबदारी आपल्या कुटुंबावरती आपल्यावरती पडत आहे.

आज आम्ही आपल्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टी वाहून नेतो, आम्ही आपल्या जीवनामध्ये आमच्या मुलाबाळाना कोणत्या गोष्टी देतो त्यांच्या पर्यंत कोणत्या गोष्टी पोहोचवतो जगाचे मोह जर आपल्या मुलाबाळापर्यंत पोहोचवू तर आपली मुलेही जगाची होणार आहे याच मुलाकडे आपण जर ख्रिस्ताची वचने जर आपल्या मुलांकडे घेऊन गेलो तर ख्रिस्तमय होणार आहे.आणि म्हणून कुटुंबातील वातावरण फार फार महत्वाचे आहे आज आपल्याला समाज घडवायचा असेल तर आपण कुटुंब घडवायला पाहिजे म्हणून आई - वडिलांच्या खांद्यावर आज ख्रिस्तसभा फार मोठी जबाबदारी आहे. ती आपल्या मुलाबाळांच्या संगोपनाची ठेवत आहे.आणि म्हणून प्रथम आपले ख्रिस्ती कुटुंब हे ख्रिस्त केंद्रित व्हायला पाहिजे.जग केन्द्रीत व्हायला नको आहे.जर आपले कुटुंब जगकेंद्रित झाले तर आपल्या मुले सुद्धा या जगाची होणार आहेत परंतु आपले कुटुंब जर ख्रिस्तकेंद्रित झाले तर आपली मुले ख्रिस्ताला ख्रिस्तसभेला चर्चला कधीच होणार नाहीत. म्हणून आज ही जबाबदारी घेत असताना पवित्र मरीयेजवळ विशेष प्रार्थना करू या की तिचा आदर्श घेऊ या की जिने आपले सर्वस्व देवाच्या योजनेसाठी दिले.ती कराराची कोष झाली प्रभू येशूला तिने आपल्या उदरामध्ये नऊ महिने सांभाळले.त्यानंतर तीन महिने त्याचेजवळ राहिली तिने त्याचे दु:ख,मरण पाहिले.शेवटी पुनरुत्थानाचा अनुभव घेतला.आणि देवाची योजना परिपूर्ण तिनेच केली.आज विशेष करून अभिमानाने सांगू शकतो कीआपल्याला पवित्र मरिया आपली आई म्हणून मिळालेली आहे आज त्या आईचा सन्मान करीत असताना विशेष करून आपल्या कुटुंबासाठी विशेष प्रार्थना करू या.कुटुंबामध्ये आपण ख्रिस्ताची वचने मुलाबाळापर्यंत पोचवावी. त्यांचे जीवन ख्रिस्तमय करावे यासाठी प्रार्थना करू या असे प्रतिपादन रे फा विल्सन परेरा यांनी सहाव्या शनिवारी पवित्र मरिया कराराचा कोष या विषयावर मतमाउली यात्रापूर्व नोव्हेना प्रसंगी केले. यावेळी रे फा सायमन शिणगारे,रिचर्ड भूरखाव, अजय डीमोंटे,अनिल पंडित,विश्वास,मारवन व डॉमनिक रोझारिओ, फ्रान्सिस ओहोळ,संतान रॉड्रीग्ज,आदी धर्मगुरू सहभागी होते.येत्या सातव्या नोव्हेना शनिवारी पवित्र मारिया शोसिकतेचा उच्चांक या विषयावर सेक्रेड हार्ट सोनगाव, संत जोसेफ चर्च पानोडी येथील धर्मगुरू प्रवचन करणार आहेत असे हरिगांव प्रमुख धर्मगुरू फा डॉमनिक रोझारिओ यांनी सांगितले.

वृत्त विशेष सहयोग, ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे , शिरसगांव 
संकलन - समता न्यूज सर्व्हिसेस श्रीरामपूर,९५६११७४१११
close