shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

इंदापूर महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी पारंपरिक खेळात सहभागी होऊन लुटला आनंद*

*इंदापूर महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी पारंपरिक खेळात सहभागी होऊन लुटला आनंद*
  इंदापूर : इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय कनिष्ठ विभागाच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, संस्थेचे संचालक युवानेते राजवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे आणि उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे यांच्या प्रेरणेने क्रीडा व सांस्कृतिक विभागाने नागपंचमी निमित्ताने क्रीडांगणावर आयोजित केलेल्या पारंपारिक खेळामध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन आनंद लुटला.
    नागपंचमी सणानिमित्त महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागाच्या कला व वाणिज्य विभागामधील मुलांनी व मुलींनी उत्साहामध्ये आट्या-पट्या ( सूर पट्ट्या) कबड्डी, खो-खो , व्हॉलीबॉल ,मुलींचे पारंपारिक खेळ यामध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी होत आपला आनंद द्विगुणित केला.
   क्रीडा विभाग प्रमुख प्रा.बापू घोगरे आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. रोहिदास भांगे तसेच सहकारी प्राध्यापक यांनी उत्कृष्ट नियोजन करीत सहभागी खेळाडूंना प्रोत्साहन दिले.
close