shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

लोकमान्य व लोकशाहीर यांचे योगदान अतुलनीय -प्राचार्य प्रमोद तोरणे


शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
धार्मिक बातमी 

अहमदनगर -- लोकमान्य टिळक यांनी स्वातंत्र्य चळवळ करिता तर लोहशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्राकरिता योगदान दिले आहे त्याचे योगदान. देश विसरणार नाही असे प्रतिपादन मायादेवी अबट विद्यालय भिंगार चे प्राचार्य प्रमोद तोरणे यांनी केले.

श्रीम मायादेवी ऑबट विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्य तिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली त्या प्रसंगी ते अध्यक्ष पदावरून बोलत होते 
ते पुढे म्हणाले कि, लोकमान्य टिळक यांनी स्वातंत्र चळवळ मोठया प्रमाणात 
चालवली केसरी वर्तमान पत्र काढून 
जनजागृती केली लोकशाहीर अण्णा भाऊ नी मराठी साहित्यात विपुल लेखन करून ग्रामीण प्रश्न मांडले रशियात रेडिओ वरून भाषण दिले संयुक्त महाराष्ट्र चळवळ जोमात चालवली 
प्रारभी लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले 

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक माधव रेवगडे यांनी केले.
कुमार बडे साई आणि प्रतीक लोखंडे 
यांनी लोकमान्य व लोकशाहीर यांची वेशभूषा केली होती शिक्षक प्रतिनिधी म्हणून श्री देवकर एस एन यांचे तर विदयार्थी प्रतिनिधी 
म्हणून टकले छकुली सायली मोरे कुताल ईश्वरी आदिती गर्जे जावळे प्रतिमा समर्थ भिंगारदिवे यांची भाषणे झाली 

सूत्र संचालन दिशा पाखरे व श्रुती सातपुते यांनी तर आभार आश्वर एस एम यांनी केले
close