shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

भिमाई आश्रमशाळेत विद्यार्थ्यांनी लुटला पतंग उडविण्याचा व झोके खेळण्याचा आनंद..* *औचित्य होते नागपंचमी सण.*

*भिमाई आश्रमशाळेत विद्यार्थ्यांनी लुटला पतंग उडविण्याचा व  झोके खेळण्याचा आनंद..*
 *औचित्य होते नागपंचमी सण.*
*इंदापूर*(*दि.९*): विद्यार्थ्यांना रुढी परंपरा व संस्कृतीची माहिती व्हावी या हेतूने श्रावण मासातील नागपंचमी या सणाचे औचित्य साधत विद्यार्थ्यांनी स्वतः पतंग तयार करुन ते उडविण्याचा व झाडाला बांधलेले झोके खेळण्याचा आनंद घ्यावा, याकरिता डॉ.बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात वरील उपक्रमाचे आयोजन केल्याची माहिती प्राचार्या अनिता साळवे यांनी दिली.
मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट इंदापूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलाच्या आवारात संकुलातील बच्चे कंपनीने स्वतः बनविलेले पतंग उडविण्याचा व झाडाला बांधलेले झोके खेळण्याचा मनमुराद आनंद  लुटला.
 श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणून नागपंचमीला विशेष महत्व आहे. ग्रामीण भागासह शहरात देखील नागपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या दिवशी अनेक ठिकाणी झोके बांधले जातात.नागपंचमी दिवशी मुली व महिलांनी झोके खेळण्याची परंपरा आहे.झोके खेळल्यामुळे बच्चे कंपनीचा उत्तम व्यायाम झाला. त्यांना आरोग्याचे अनेक फायदे मिळाले. पतंग उडविण्यात व  झोका खेळण्यात शैक्षणिक संकुलातील बच्चे कंपनी दंग होऊन गेल्याचे चित्र दिसून आले. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद  द्विगुणित झाल्याचे जाणवत होते. बच्चे कंपनीला पतंग उडविण्याची व झोके खेळण्याची संधी प्राचार्या अनिता साळवे यांनी उपलब्ध करून दिल्याने विद्यार्थ्यांनी त्यांचे मनापासून आभार मानले.
close