श्रीरामपूर / प्रतिनिधी:
श्रीरामपूर तालुक्यातील दिघी येथील दिली प्रगत सोसायटीच्या चेअरमन पदी दगडू डांगे तर व्हा. चेअरमनपदी भिमबाई पठारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. माजी आ.स्व.जयंतराव ससाणे यांच्या कृपाशीर्वादाने दिघी सोसायटी प्रगतीपथावर आहे.
सोसायटीची निवडणूक होऊन या सोसायटीवर ससाणे गटाचे प्राबल्य आहे. ससाणे गटाचे दगडू पा. डांगे यांनी चेअरमन पदासाठी अर्ज दाखल केला, सूचक रामदास म्हसे तर अनुमोदक रवींद्र खडके होते. तर व्हा. चेअरमन पदासाठी भीम बाई पठारे यांनी अर्ज दाखल केला.या अर्जासाठी सुचक मिननाथ पा. खडके तर अनुमोदक दत्तू पा.डांगे होते. यावेळी निवडणूक अधिकारी जोशी साहेब यांनी काम पाहिले. याप्रसंगी जि प चे माजी सभापती बाबासाहेब दिघे, माजी सरपंच राधाकिसन पा.डांगे, सदस्य ज्ञानदेव डांगे,राजेंद्र खडके, बापू पोलादे, चंद्रकला गायकवाड, शोभा डांगे, बाळू धीवर, नाना धुळगंड, विलासराव शेजुळ, बाबा गायकवाड, गोरख पटारे, मच्छिंद्र वाणी, संजू डांगे, निवृत्ती डांगे, लक्ष्मण डांगे, सोमनाथ डांगे, गौरव डांगे, नितीन डांगे, रावसाहेब डांगे, सचिन कालंगडे, भास्कर लबडे, चांगु पवार, विजय निकम, दत्तू पठारे, दत्तू डांगे,सचिव सौरभ धुजरडे उपस्थित होते. दगडू डांगे व भिमबाई पटारे यांच्या निवडी बद्दल जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, जि प. चे माजी सभापती बाबासाहेब दिघे, श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर नवले, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस हेमंत ओगले यांनी अभिनंदन केले आहे.
संकलन,समता न्यूज सर्व्हिसेस,श्रीरामपूर - ९५६११७४१११