shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

एल.जी. बनसुडे विद्यालयात पारंपरिक सणाची* *जोपासना*

*एल.जी. बनसुडे विद्यालयात पारंपरिक सणाची* *जोपासना* 
पळसदेव(ता. इंदापूर) येथील गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एल.जी. बनसुडे विद्यालय मध्ये  विद्यार्थ्यांनी नागपंचमी हा पारंपारिक सण मोठ्या उत्साहाच्या व आनंदाच्या वातावरण साजरा केला. *"जतन करूया नागाचे* *रक्षण करूया पर्यावरणाचे"* हा संदेश  विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी  अशा पारंपारिक सणांचे आयुष्यात महत्त्व असते अशी माहिती शाळेच्या प्राचार्य  वंदना बनसुडे  यांनी दिली. विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी वारुळाची प्रतिकृती तयार करून विद्यार्थ्यांना पर्यावरणामध्ये साप हे क्षेत्रपाल आहेत व कोणतीही अंधश्रद्धा न बाळगता साप हे शेतकऱ्यांचे मित्र कसे असतात अशी माहिती विद्यार्थ्यांना दिली. शाळेच्या प्रांगणामध्ये सर्व  विद्यार्थ्यांनी मेहंदी, झिम्मा, फुगड्या व वारुळाभोवती फेर धरणे असे अनेक पारंपरिक खेळ खेळले. सर्व विद्यार्थ्यांनी पतंग उडविण्याचा मनमुराद आनंद घेतला. सर्व विभागाचे विभाग प्रमुख ज्योती मारकड, तेजस्विनी तनपुरे, सीमा बाराते , समन्वयक सुवर्णा वाघमोडे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी यांच्या सहकार्यातून हा सण उत्साहात साजरा झाला.
close