श्रीरामपूर / प्रतिनिधी:
श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील ग्रामीण भागाबरोबरच श्रीरामपूर शहरातील विकास कामांना प्राधान्य देऊन आपण कोट्यावधी रुपयांची कामे केली. यापुढेही शहरातील विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही आमदार लहू कानडे यांनी दिली.
शहरातील प्रभाग चारमध्ये केलेल्या विकास कामांबद्दल या प्रभागातील नागरिकांच्यावतीने आ. कानडे यांना विकास सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, तालुका अध्यक्ष अरुण पाटील नाईक, माजी नगरसेवक अशोक (नाना) कानडे, सतीश बोर्डे, सचिन जगताप, राजू साळवे, पत्रकार दीपक कदम आदि मान्यवर व्यासपीठावर होते.
यावेळी बोलताना आ. कानडे म्हणाले, गेल्या चार वर्षात मतदार संघात आपण मोठ्या प्रमाणात विकास कामे केली. कामे करताना दुजाभाव केला नाही. ग्रामीण भागाबरोबरच शहरातील विकास कामांना प्राधान्य दिले. श्रीरामपूर एमआयडीसीत 220 केव्हीचे हाय पॉवर सबस्टेशन मंजूर केल्याने एमआयडीसीतील उद्योगांमध्ये वाढ होऊन तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे. स्मशानभूमीमध्ये विद्युत गॅस दाहिनी बसविली. कोरोना काळात ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन प्लांटची उभारणी केली. तसेच शहरातील विविध भागातील रस्त्यांसह तरुणांसाठी ओपन जीम्सची उभारणी केली. समाज मंदिरासाठी निधी देऊन विविध भागात पेविंग ब्लॉक बसविले. यापुढेही शहरातील विकास कामांना भरीव निधी देऊन विकास कामे केली जातील असेही ते म्हणाले.
यावेळी सचिन गुजर म्हणाले की, विकास कामे करताना आ. कानडे यांनी कोण आपला, कोण विरोधक हे न पाहता कामे केली आहेत. आता आगामी निवडणुकीच्या निमित्ताने अनेकांच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत. परंतु शहरातील जनता सुज्ञ असून ती विकास कामांबरोबर राहील तथा कोणाच्याही बनवेगीरीला बळी पडणार नाही असेही ते म्हणाले.
याप्रसंगी अरुण पाटील नाईक, अशोक (नाना) कानडे यांनी मनोगत व्यक्त केले.
आपल्या भागातील कामे केल्याबद्दल बोरावकेनगर, अतिथी कॉलनी,आशीर्वाद नगर, पठाण वस्ती, रेव्हन्यु कॉलनी या भागातील नागरीकांच्यावतीने आ. कानडे यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी अतिथि कॉलनी विकास मंडळाचे अध्यक्ष ऍड. बाबासाहेब मुठे, व्ही. एम. कुलकर्णी, सुभाष लिंगायत, धुमाळ सर, नाईक सर,गंधे सर,ऍड कारखानीस, फापाळे सर, वाणी सर, प्रदीप आखेगावकर, पोटघन सर, हिंगणीकर साहेब, श्री. लोखंडे, रायपल्ली साहेब, जोशी सर, कर्डीले, वाघ नाना, विकास लिंगायत, डॉ. गोकुळ मुठे, पाटील सर, अमोलिक सर, बाबासाहेब मुठे, प्रकाश देशमुख, सुरंजन साळवे, विलास कुलकर्णी, मुकुंद नरवडे, पाटील सर, सचिन मुळे, अधिक जोशी, चंद्रकांत वायकर, राकेश दुशिंग, लेविन भोसले, अश्फाक शेख, संजय जोर्वेकर, निशिकांत पंडित, शरद पंडित, सौ. धुमाळ, सौ. आखेगावकर, सौ. रायपल्ली, संगीता मुठै, ललिता टाकसाळ, सुमित्रा लिंगायत, प्रतिमा पंडित, अंजली कारखानीस, संगीता लटमाळे, मनीषा मुठे, वैशाली जोशी आदींसह नागरिक उपस्थित होते.
वृत्त विशेष सहयोग
पत्रकार दिपक कदम, श्रीरामपूर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111