शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
धार्मिक बातमी
आज दिनांक १ ऑगस्ट २०२४ रोजी साईसेवा निवासी मतिमंद मुला-मुलींची शाळा शिर्डी येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व आण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली.
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील मजबूत जहालवादी नेते, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच! या घोषणेसाठी ओळखले जाणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त व मराठी समाज सुधारक, लोककवी, लेखक आणि दलित साहित्याचे संस्थापक म्हणून ओळखले जाणारे असे आण्णाभाऊ साठे (मूळ नाव- तुकाराम भाऊराव साठे) यांच्या जयंतीनिमित्त विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुनंदा घुले मॅडम यांच्या शुभहस्ते टिळक व साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार घालण्यात आला. तसेच विद्यालयातील मानसोपचार तज्ञ श्रीमती हेमलता पवार मॅडम यांनी या थोर महापुरुषांविषयी माहिती सांगितली. विद्यालयातील सर्व कर्मचारी व विद्यार्थ्यांकडून विनम्र अभिवादन करण्यात आले.
हा कार्यक्रम विद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडला.