इंदापूर तालुक्यातील सपकळवाडी गावचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण.
आमदार दत्तात्रय भरणे यांनी सरपंच उपसरपंचाचे व गावातील कर्मचारी ग्रामस्थांचे केले कौतुक.
इंदापूर: इंदापूर तालुक्यातील सपकळवाडी या गावात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व महिलांचे ऑनलाईन व ऑफलाईन फॉर्म भरून १००% चे उद्दिष्ट पूर्ण केले> त्याबद्दल इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते सरपंच रोहिणी ताई सोनवणे व उपसरपंच सचिन सपकळ यांचा सत्कार करून गौरविण्यात आला यावेळी आमदार दत्तात्रय भरणे यांनी उपस्थित सर्व महिला भगिनींना या ग्रामपंचायतीने केलेल्या कामाचे कौतुक केले यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर,इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील, गट विकास अधिकारी सचिन खुडे तसेच इतर अधिकारी, संत सावतामाळी महाराज पुण्यतिथी निमित्त उपस्थित असणारे भाविक होते.