shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

साईनाथ मंगल कार्यालयात लाडू काउंटर सुरू व्यावसायिकांनी मानले विखे पाटलांचे आभार


शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
 सामाजिक बातमी 

नामदार राधाकृष्ण विखे पा. व्यापारी संकुलात म्हणजेच साई कॉम्प्लेक्स मध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून नूतन दर्शन रांग इमारत उभी राहिली आणि सोळा गुंठे शेजारील गेट मधून सुरू असलेली दर्शन रांग बंद करण्यात आली तेव्हापासून व्यवसायाची परिस्थिती दयनीय झालेली आहे अनेकदा याबाबत स्थानिक पातळीवर आम्ही दुकानदारांनी मिळून अनेकदा प्रयत्न केला मात्र परिस्थिती जैसे थे राहिली आज मितीला शिर्डीत गर्दी कमी झाल्याने अक्षरशः दुकानाचे भाडे सुद्धा सुटणे मुश्किल झाले आहे अनेकांना दुकान सोडावे तर इतर काय व्यवसाय करावा असा प्रश्न पडला आहे.

याबाबत काही उपाययोजना कराव्या म्हणून आम्ही युवानेते माननीय सुजय दादा विखे पाटील यांना आमच्या व्यथा सांगत *साई कॉम्प्लेक्स समोर एक लाडू काउंटर आणि सशुल्क पास काउंटर सुरू करावे अशी मागणी केली असता सुजय दादांनी तात्काळ संस्थान प्रशासनाला सांगत आज लाडू काउंटर सुरू केले आणि लवकरच सशुल्क पास चे काउंटर देखील सुरू करणार असल्याचा विश्वास दिला*.

दिलेला शब्द पूर्ण करणारा नेता म्हणून सुजय दादांकडे पाहिले जाते आणि आज त्यांनी 200 च्या वर दुकानदारांना दिलेला शब्द वेळेत पूर्ण केला आज गर्दी कमी आहे म्हणून ठीक आहे मात्र गर्दीच्या दिवशी तरी भाविक लाडू घेण्याच्या निमित्ताने कॉम्प्लेक्स कडे येतील आणि दुकानदारांना दिलासा मिळेल अशी आमची खात्री आहे आणि दुकानदारांना दिलासा मिळण्यासाठी सुजय दादांनी केलेला प्रयत्न आमच्यासाठी अनमोल असून *यापुढील काळात दुकानांचे वाढलेले भाडे आणि नो होकर्स नो पार्किंग झोन बाबत माननीय मुख्याधिकारी सतीश दिघे यांच्या सोबत मीटिंग लावणार असल्याचा शब्द दादांनी दिला* असून तोसुद्धा प्रश्न लवकरच मार्गी लागेल अशी आमची खात्री आहे. 

पुन्हा एकदा सर्व साई कॉम्प्लेक्स दुकानदारांच्या वतीने महसूलमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पा. आणि युवानेते माननीय सुजय दादा विखे पा. यांचे मनापासून आभार मानले
close