श्रीरामपूर / प्रतिनिधी:
प्रत्येकाशी भावनिक नाते नसल्याने हा कोणी गुन्हेगार तर नाही ना अशा संशयीत नजरेने बघत श्रीरामपूर विधानसभेच्या विद्यमान लोकप्रतिनिधींनी साध्या शिफारशीसाठी तालुक्यातील नागरीकांना हैराण केले. असे मत शेतकरी युवक संवाद यात्रेच्या माध्यमातून हेमंत ओगले यांनी मांडले. लोकप्रतिनिधींकडे आलेल्या नागरिकांचे आधारकार्ड वरचे नाव बदलण्यासारखे साधे काम असताना, ज्या सेतु चालकांनी पाठवले त्यांना धमकावण्याचे काम यांनी केले. त्यामुळे ति व्यक्ती पुन्हा सेतु कार्यालयात गेल्यावर तुम्ही माझा परवाना रद्द करताल, असे ऐकायला मिळत असल्याने तालुक्यातील नागरीकांनी विधानसभेच्या लोकप्रतिनिधीच्या संपर्कात जाणेच टाळले असे अनेक प्रसंग असल्याचे ओगले यावेळी म्हणाले.
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन तेथील शेतकरी, युवक आणि जनतेसोबत संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी आणि काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी जिल्हा बँकेचे संचालक मा. उपनगराध्यक्ष करण ससाणे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणिस हेमंत ओगले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा परिषदेचे सदस्य बाबासाहेब दिघे आणि मार्केट कमिटीचे सभापती सुधीर नवले यांच्या उपस्थितीत शेतकरी युवक संवाद यात्रा काढण्यात आली.
यात्रेच्या आठव्या दिवशी हेमंत ओगले यांनी सकाळच्या सत्रात श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव, कुरणपूर, गळनिंब येथील ग्रामस्थांसमवेत संवाद साधला.
येथे कॉर्नर सभेत मनोगत व्यक्त करताना हेमंत ओगले म्हणाले की, राजकारण हे केवळ निवडणुकीपुरते मर्यादीत असल्याने निवडणुकीनंतर लोकप्रतिनिधी हा सर्वांचा असतो, मात्र विधानसभेच्या
लोकप्रतिनिधींनी समोर येणारी व्यक्ती गुन्हेगार असल्याच्या संशयी प्रवृतीतुन नागरीकांना हैराण केले. शिफारस पात्राला किती महत्व आहे हे सर्वज्ञात असताना देखील त्रास दिल्याने नागरीकांनी पर्याय शोधत स्वतःची कामे केली.याउलट स्व. जयंतराव ससाणे त्यांच्या अनुपस्थितीत कुणाचीही गैरसोय होणार नाही अशी सोय ते लावून जात असत .कित्येक नागरीक सांगतात की त्यांच्या कडे आजही स्व.जयंतराव ससाणे यांचे सही केलेलं कोरे लेटर पॅड आहे.त्यामुळे नागरीकांना अशा कामाची सवय होती. या संवाद यात्रेच्या माध्यमातुन संवाद साधत असताना आजही गावागावातील ग्रामस्त भावनिक होऊन ह्या गोष्टी सागंतात असे हेमंत ओगले म्हणाले.
कष्टकरी, शेतकरी माता भगिनी युवकांच्या सन्मानासाठी शेतकरी युवक संवाद यात्रेनिमित्त आवाज तुमचा संपर्क आमचा हे ब्रिद वाक्य घेऊन, मतदारसंघातील अंतिम घटकापर्यंत जाऊन त्यांच्या समस्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी व त्यांच्या सोबत संवाद साधण्यासाठी शेतकरी युवक संवाद यात्रा सुरू केलेली आहे. आज तुमच्या समस्या जाणून घेऊन आगामी काळात करण ससाणे आणि हेमंत ओगले यांच्या तसेच काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या सोडविण्यासाठी पर्यंत करणार असल्याचे आश्वासनही यावेळी त्यांनी दिले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबासाहेब दिघे म्हणाले की, भविष्यात विकासकामांना वेग देण्यासाठी हेमंत ओगले हेच योग्य असुन श्रीरामपूर विधानसभा हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने तसेच येथील मतदारांना हेमंत ओगले यांच्या रूपाने चांगला पर्याय मिळाला आहे.
यावेळी स्व. जयंतराव ससाणे यांच्यावर प्रेम करणारे मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११