अहमदनगर जिमाका वृत्तसेवा:
सन २०२४ या वर्षात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडुन पुरस्कार देण्यासाठी स्पर्धेचे आयोजन केले आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक गणेशोत्सव मंडळांना या स्पर्धेमध्ये सहभागी करुन घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. सालीमठ यांनी यावेळी दिले.
जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांशी समन्वय साधण्यासाठी शासन निर्देशाप्रमाणे समितीचे गठन करण्यात यावे. जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बैठका घेऊन त्यांना या स्पर्धेविषयी माहिती देण्याच्या सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर- ९५६११७४१११