श्रीरामपूर/ प्रतिनिधी:
श्रीरामपूर शहरात अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले असून तुंबलेल्या गटारी व कचरा यामुळे दुर्गंधी पसरुन मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे पालिकेने तात्काळ डास प्रतिबंधात्मक औषधांची फवारणी करावी अशी मागणी जिल्हा बँकेचे संचालक माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी केली आहे.
शहरात डासांच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे व वाढत्या घाणीमुळे शहरात डास तयार होऊन डेंगू,मलेरिया, हिवताप यासारख्या साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नगरपालिकेने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने शहरातील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावून स्वच्छतेच्या उपाययोजना कराव्यात व मोठ्या प्रमाणावर डास प्रतिबंधात्मक धूर व औषध फवारणी करावी अन्यथा श्रीरामपूर शहर काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही करण ससाणे दिला आहे.
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११