shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

भरधाव ट्रकने चिरडली सहा वाहने अनेक जण जखमी सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


सोनई प्रतिनिधी मोहन शेगर 

पांढरीपूल येथे भीषण अपघातात २० जण जखमी; चार कार, टेम्पो आणि दुचाकीचा समावेश
छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पांढरीपूल घाटातील  उतारावरुन भरधाव जाणाऱ्या ट्रकने सहा वाहनांना चिरडल्याने झालेल्या भीषण अपघातात सुमारे २० जण जखमी झाले. सोमवारी (दि. २९) घडली. सायंकाळी हा अपघात झाला. पांढरीपूल येथे अपघातांची मालिका सुरूच असून, त्यावर उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने (एमएच १६ सीसी ४३४३) पांढरीपूल घाटातील तीव्र उतारावरून जाताना समोरील चार कार, एक टेम्पो आणि एका दुचाकीला चिरडले. सायंकाळी सहाच्या सुमारास पांढरीपूल परिसरात मोठी वर्दळ असते. त्याच वेळी हा अपघात घडल्याने जखमींची संख्या जास्त आहे.
भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने चिरडलेल्या वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला आहे. वाहन कोणत्या कंपनीचे आहे हे ओळखणेही अवघड झाले होते. अपघातानंतर महामार्गावर सर्वत्र जखमीचा आरडाओरडा सुरू झाल्याने मोठा गोंधळ उडाला होता. प्रत्येक धडक एवढ्या जोराची होती की दोन कार रस्त्याच्या विरुद्ध दिशेला फेकल्या गेल्या होत्या. अपघातात सर्व वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. काही जण गंभीर जखमी झाले, तर काहींना किरकोळ मार लागला. घाटातील तीव्र उतारावर ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.
        अपघातानंतर ट्रक सुमारे दोन किलोमीटर अंतरावरील हॉटेलवर उभा करून चालक पळून गेला. सोनईच्या पोलिसांनी घटनास्थळी येऊन ठप्प झालेली वाहतूक सुरळीत केली. जखमींवर नगर येथील खासगी तसेच काहींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर स्थानिक तरुणांनी जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी मोठी मदत केली. 

       याबाबत सायमा रज्जाक शेख वय 19 वर्ष राहणार भानसहिवरा व इतर सात ते आठ इसम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादीच्या घराशेजारी राहणारे प्रियांक अमोल वाघमारे, सोमय्या शाकीर पठाण, राणी गणेश बोगळ, संगीता सागर गव्हाणे, ताई बाळासाहेब लोडगे, खातूनबी रहीम शेख, हसीना वाजिद शेख,, गया कदम, फिर्यादीचे चुलते पप्पू रसिक पठाण , यांच्या शेतात मारुती इको कार क्रमांक एम एच 14 जे इ ३४०१ पिंपळगाव येथून परत भानाशिवरे येथे येत असताना शिवनेरी भेळ सेंटर जवळ पांढरी पुल येथे एक ट्रक क्रमांक एम एच १६ -४३४३ तिच्यावरील चालकाने त्याची कारला भरधाव वेगाने जोरात चालून रोडच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून आमचे इगो कारला जोराची धडक मारून अपघात करून इतर वाहनाला सुद्धा धडक मारून अपघात करून वाहनातील लोकांचे कमी अधिक व  जबर दुखापतीस व वाहनाचे नुकसानीस कारणीभूत होऊन अपघाताची खबर न देता व जखमीस कोणत्याही प्रकारची मदत न करता त्यांच्या कडील ट्रक हॉटेल नीलकमल येथे थांबून पळून गेला आहे वरील फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाण्यात गु र न ३२९/२०२४ थी एन एस चे कलम २८१,१२६(आ)१२५(४)३२४(४)(५) मोटार वाहन कायदा कलम १८४/१३४(आ)(४)१७७ प्रमाणे दाखल करण्यांत आला असून याप्रकरणी अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल एम आर अडकिते हे करीत आहेत 



अपघातांची मालिका सुरूच; नागरिक संतप्त
 दरम्यान, पांढरीपूल परिसरात अपघातांची मालिका सुरूच असून त्यात अनेक निष्पापांचे बळी गेले आहेत. याबाबत परिसरातील रहिवाशांनी तसेच वाहन चालकांनी वेळोवेळी आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. येथील अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला होता. तरीही उपाययोजना झाल्या नाहीत. वारंवार मागणी करूनही या बाबीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने, तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माजी सरपंच सोमनाथ हारेर, सतीश थोरात, वैभव खंडागळे, बद्रिनाथ खंडागळे, हरिभाऊ भवार, आदिनाथ काळे, शिवराज काळे, संतोष हारेर, महेश काळे, दिलीप औटी यांनी दिला आहे.
close