नागपूर/ वर्धा प्रतिनिधी:
श्रमजीवी ग्रामीण पत्रकार संघाचे २ दिवसीय विभागीय अधिवेशन येत्या २४ व २५ ऑगस्ट २०२४ रोजी हिंगणघाट येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
श्रमजीवी ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष शेख इस्तियाक यांनी गत ५ वर्षात केलेले उत्कृष्ट सामाजिक कार्य पाहून तथा त्या कार्यांची दखल घेऊन पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष महेश ठाकूर (सोनी) व सचिव इम्रान चिस्ती यांनी शेख इस्तियाक यांची पुन्हा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
महाराष्ट्र राज्यात कार्यरत श्रमजीवी ग्रामीण पत्रकार संघाचे २ दिवसीय विभागीय अधिवेशन २४ आणि २५ ऑगस्ट २०२४ रोजी हिंगणघाट येथे होणार आहे. या कार्यक्रमात संस्थापक अध्यक्ष महेश ठाकूर (सोनी) व सचिव इम्रान,चिस्ती, राजेंद्र अतकरे, वर्धा, अमरावती, अकोला या जिल्ह्यांतील पत्रकार संघाच्या कल्पना काळे यांच्यासह अ.भा. स्वाभिमानी संपादक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष मा. शौकतभाई शेख यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
यासोबतच महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते,सरपंच, ग्रामसेवक, डॉक्टर्स, इंजिनिअर्स अशा अनेकांचा यावेळी यथोचित सन्मान/ सत्कार करण्यात येणार आहे. तसेच श्रमजीवी ग्रामीण पत्रकार संघाच्या माध्यमातून उपेक्षित घटकातील गोर - गरीब, वयोवृद्ध महिला, पुरूष अनाथ मुला-मुलींना नवीन कपड्यांचे वाटप करण्यात येणार असून हे अधिवेशन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गेल्या ५ ते ६ महिन्यांपासून पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष शेख इस्तियाक हे विदर्भातील नागपूर, गडचिरोली,चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा,अमरावती, अकोला या जिल्ह्यांतील तालुकास्तरावरील गावे व शहरांना भेटी देत असल्याची माहिती आहे. कार्यकारिणी स्थापन करण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले आहेत. आणि अधिवेशनापूर्वी त्यांनी विविध जिल्ह्यात दौरे करून पत्रकार व समाज बांधवांना जोडण्याचे कामही मोठ्या प्रमाणात केले असून, हिंगणघाट परिसरात होणाऱ्या पत्रकार संघाच्या अधिवेशनात प्रामुख्याने विदर्भातील पत्रकारांनी सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. वर्धा जिल्ह्यातील पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष पदावर असताना शेख इस्त्याक यांनी पीडित, शोषित, असहाय्य लोकांच्या मदतीसाठी पुढे येऊन समाजहिताचे कामही केले आहे. त्रस्त नागरिकांच्या समस्या सोडवत शेख इस्तियाक यांनी केलेले सामाजिक कार्य पाहून पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष महेश ठाकूर (सोनी) आणि इम्रान चिस्ती यांनी त्यांची पुन्हा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी फेरनियुक्ती केली. या नियुक्ती प्रसंगी शेख इस्तियाक यांनी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांसमोर कार्यरत ग्रामीण पत्रकार संघाला बळकटी देण्याची आणि पीडित, शोषित, असहाय्य जनतेला समस्यांमधून बाहेर काढण्याची शपथ घेतली. आणि भविष्यात श्रमजीवी ग्रामीण पत्रकार संघाच्या राज्यातील सर्व भागात शाखा असाव्यात, तसेच हिंगणघाट परिसरात २४ आणि २५ ऑगस्ट २०२४ रोजी होणाऱ्या अधिवेशनात पत्रकार मंडळी आणि सामाजिक कार्य करणाऱ्या तमाम लोकांना सहभागी होण्यासाठी श्रमजीवी ग्रामीण पत्रकार संघाच्या वर्धा जिल्हा कमेटीच्या वतीने आवाहन करण्यात आले असल्याचे प्रसिद्धस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११