shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

धरणगाव तालुक्यातील पीक नुकसानीचे त्वरित पंचनामे करा, शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्या !

 राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) तर्फे तहसीलला निवेदन...

धरणगाव तालुक्यातील पीक नुकसानीचे त्वरित पंचनामे करा, शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्या !


धरणगाव प्रतिनिधी

धरणगाव : जिल्ह्यासह धरणगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मध्यम ते जोरदार पावसाची हजेरी लागत आहे. संततधार पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचून खरीप पिके पिवळी पडत आहेत. ही स्थिती लक्षात घेता अती पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीचे तातडीने पंचनामे करून संबंधित शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे माजी मंत्री तथा पक्षाचे नेते गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वाखाली धरणगावच्या तहसीलदारांना शेतकऱ्यांच्या मागणीचे निवेदनही देण्यात आले. प्रसंगी तहसील कार्यालाच्या बाहेर निदर्शने देखील करण्यात आली. यावेळी (श.प.) राष्ट्रवादीचे जळगाव लोकसभा कार्याध्यक्ष शालीग्राम मालकर, तालुकाध्यक्ष धनराज माळी, मोहन पाटील, रवींद्र पाटील, एन.डी.पाटील, दिलीप धनगर, रंगराव सावंत, रघुनाथ पाटील तसेच युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मनोज पाटील, शहराध्यक्ष लक्ष्मण पाटील, कार्याध्यक्ष अरविंद देवरे, त्याचप्रमाणे डॉ.नितीन पाटील, कैलास मराठे, नारायण चौधरी, साईनाथ पाटील, दिनानाथ चव्हाण, उमेश चव्हाण, गजानन मराठे, घनश्याम पाटील, प्रदीप पाटील, मोठाभाऊ पाटील, गजानन पाटील, दिलीप पाटील, भाऊसाहेब पाटील, उत्तम भदाणे, किशोर भदाणे, भूषण पाटील, रवींद्र महाजन आदी उपस्थित होते. 

*▪️शेतकऱ्यांना पिकविमा योजनेचा लाभ द्या.*

पावसाची उघडीप न मिळाल्याने कापूस, मका, ज्वारी, उडीद, मूग, तूर, तीळ आदी पिकांवर कीड व रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला आहे. पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असली तरी पाऊस थांबायचे नाव घेत नसल्याने खरीप पिके हळूहळू नष्ट होण्याच्या मार्गावर येऊन ठेपली आहेत. विशेषतः सोनवद व साळवा गटात जास्त नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे संपूर्ण धरणगाव तालुक्यातील खरीप पिकांचे तातडीने पंचनामे पूर्ण करावे व भरपाई देण्याची व्यवस्था करावी. ज्या शेतकऱ्यांनी पिकविमा योजनेत सहभाग घेतला आहे त्यांनाही निकषानुसार नुकसान भरपाई मिळावी, असेही तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

close