मुलांनी पालकांना व्यसनापासून
रोखावे- युनूस तांबटकर
अहमदनगर / प्रतिनिधी:
युवा पिढी दिवसां दिवस तंबाखू गुटखा मावा धुम्रपानाच्या मोठ्या प्रमाणात आहारी जात आहे. व या व्यसनामुळे पिढी जीवनाला मुकत आहे. त्यांचे कुटुंबे उघडी पडत आहे. तरी युवक व्यसन सोडत नाही असे निदर्शनास येत आहे. तरी त्यांच्या मुलांनी घरामध्ये आपल्या पालकांना व्यसनापासून रोखण्याचे धाडस करून त्यांना आग्रह करून व्यसनापासून रोखावे असे आवाहन रहमत सुलतान फाउंडेशनचे अध्यक्ष व व्यसनमुक्तीचे प्रवक्ते युनुसभाई तांबटकर यांनी केले.
मखदूम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी, रहेमत सुलतान फाउंडेशन व मराठा सेवा संघाच्यावतीने व संजय झिंजे, आर्किटेक्ट अर्शद शेख, निलेश महाजन, सुनील रोजमॅन, अभिजीत गायकवाड, प्रफुल्ल सोनवणे, नरेश पेवाल आदी दानशुरांच्या सहकार्याने छावणी परिषदेच्या महात्मा गांधी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आले. यावेळी रहमत सुलतान फाउंडेशनचे अध्यक्ष युनूसभाई तांबटकर, मखदूम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दूल्हेखान, मुबीना बाजी, सुमैय्या सय्यद आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना युनुस भाई म्हणाले की व्यसनाने संपूर्ण जगाला आपल्या विळाख्यात घेतलेले आहे. त्यामध्ये भारतात तर जास्तच व्यसनतेचे प्रमाण वाढत चालले आहे. व त्याचे परिणाम दिर्घ काळापर्यंत भोगावे लागत आहे. तरी या व्यसनाचे नाद कसे संपवता येईल याकडे कटाक्षाने लक्ष देण्याची अत्यंत गरज असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मूबीना बाजी यांनी केले. तर सुमैय्या सय्यद यांनी आभार मानले.
*वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान, अहमदनगर
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111