shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

योजनांचा लाभ घेऊन महिलांनी स्वावलंबी बनावे..,मिलिंदकुमार साळवे यांचे प्रतिपादन ; महिलांना प्रमाणपत्र वाटप...!


श्रीरामपूर / प्रतिनिधी :
केंद्र व राज्य सरकारच्या वेगवेगळ्या विभागांमार्फत महिलांच्या उन्नतीसाठी विविध प्रकारच्या योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ घेऊन स्वयंरोजगाराच्या माध्यमातून महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहत स्वावलंबी बनावे, अशी अपेक्षा सल्ला मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य व महाराष्ट्र साऊ एकल महिला पुनर्वसन समितीचे समन्वयक मिलिंदकुमार साळवे यांनी व्यक्त केली.


      श्रीरामपूर पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित महिला मेळाव्यात ते बोलत होते. सहायक गटविकास अधिकारी उस्मान शेख अध्यक्षस्थानी होते. बचत गटांतर्गत काम करणाऱ्या महिलांसाठी शेळीपालन प्रशिक्षण वर्गाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. हे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या ३५ महिलांना यावेळी सहायक गटविकास अधिकारी शेख, साळवे व इतर मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. डॉ. महेश्वर गुंड यांनी हे प्रशिक्षण दिले. महिला बचत गटांचे प्रभाग समन्वयक किरण शेरे, अशोक रासकटला यांची प्रमुख उपस्थिती होती. बचत गटांच्या प्रशिक्षण सल्लागार शालिनी ससाणे यांनी प्रास्ताविक केले.
      यावेळी मिलिंदकुमार साळवे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार, तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार विविध घटकातील महिलांच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजना राबवित आहेत. फक्त अनुदानाचा लाभ न मिळविता योजनांच्या माध्यमातून महिलांनी स्वयंरोजगार सुरू करून समाजात ताठ मानेने स्वतःच्या पायावर उभे राहत स्वावलंबी बनून इतर महिला भगिनींसमोर आदर्श निर्माण केला पाहिजे. 
        प्रमाणपत्र प्राप्त महिलांना पंचायत समितीच्या वतीने नरेगा योजनेंतर्गत जॉबकार्ड दिले जाणार आहेत, असे पंचायत समितीच्या रोहयो विभागाचे अधिकारी किशोर साळवे यांनी सांगितले. तसेच गाय, शेळीपालन व्यवसाय व त्यासाठी आवश्यक गोठा यासाठी अनुदान, कर्ज मिळवून देण्यासाठी मदत व मार्गदर्शन करण्यात येणार आहे,असे शालिनी ससाणे व शेरे यांनी सांगितले.

*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111
close