shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

समाजभूषण ॲड. बापूसो. संभाजीराव पगारे यांच्या समाज कार्याला तोड नाही. ना.श्रीअतुलजी सावे सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य


शिर्डी : [ संजय महाजन ] 
सामाजिक स्तरात राहून, स्वकष्टार्जित जिवन जगत  आल्या पासून, आजपर्यंत सेवाभावी वृत्तीने कार्य करणारे, तसेच राजकीय, शैक्षणिक, क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीची उतुंग भरारी घेत, स्वःताच्या शिक्षण संस्थेच्या अनेक ठिकाणच्या शाळा  निवासीवस्तीगृहे वाचनालये चालवतांना, समाजाच्या आर्तपिडीत  गोरगरीब, समाज बांधवांच्या अडीनडीला / आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या / गंभीर आजारी रूग्णाला / शाळा कॉलेज / महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी उदार हस्ते नेहमीच निःसंकोचपणे आर्थिक मदत करण्यात ॲड. बापूसो. संभाजीराव पगारे नेहमीच आघाडीवर असतात. त्यांनी त्यांच्या जिवनात, शेकडो गरजूंना,संस्थांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत दिलेली आहे. त्यांच्या योगदानामुळे कितीतरी समाज बांधवांचे शिक्षण, आरोग्य सुधारले आहे. त्यांच्या कर्तृत्वाची दातृत्वाची दखल घेत, यंदाचा बहुमानांकित प्रतिष्ठेचा समजला जाणारा आदर्श माळी युवक मंडळ छत्रपती संभाजी नगर यांचा २०२४ चा राज्यस्तरिय समाजभूषण पुरस्कार ना.अतुलजी सावे यांच्या शुभहस्ते विद्यार्थी गुणगौरव सोहळा छत्रपती संभाजी नगर येथे ॲड. बापूसो संभाजीराव पगारे यांना देऊन  सन्मानित करून, पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

पुरस्कार प्रेरणा देतात अशाच प्रेरणेने समाजोन्नती होते. उच्च विद्याविभूषित समाजभूषण ॲड. संभाजीराव पगारे यांच्या सामाजिक कार्याला तोड नाही.त्यांच्या आर्थिक बौध्दीक सेवा कार्याने निश्चितच समाचाचे प्रबोधन होईल असे उदगार ना. अतुलजी सावे यांनी आपल्या ओघवत्या मनोगतातून व्यक्त केले. या प्रसंगी गायत्री उद्योगचे चेअरमन  चंद्रकांतजी बागुल अध्यक्षस्थानी होते, प्रमुख पाहूणे म्हणून, आक्कासो. सौ. पुष्पलता पगारे मा. डॉ.विजयराव कानडे, से. नि. इंजि. वासुदेवराव बोराडे साहेब, गजानन पायघन, डॉ. नितीन डोईफोडे, श्री प्रकाश मारोटकर, शिवाजीराव नांदगावकर, पुंडलिक पायघन, श्री संतोषभाऊ कोल्हे, सौ. स्वातीताई कोल्हे, दिगंबरराव गुंजकर  किशोरजी घरटे साहेब, अशोक पाटील साहेब, पी. एम. डहाके, सौ. शालिनीताई बुंधे,  रामभाऊ पेरकर साहेब उपस्थित होते. 

पिंपळनेर येथून  विजयराव सोनवणे, सामोडे, पिंपळनेर, मैंदाणे, येथून बापूंच्या शिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक शिक्षक वर्ग आवर्जून उपस्थित होते. ताहाराबाद येथून गजानन साळवे,  लेखक साहेबरावजी नंदन सह स्वप्नीलभाऊ पगारे, सौ. छाया पगारे, सौ. इंद्रायणीताई वरंदळ,  निर्णयसागर सोनवणे, सौ. संध्याराणी सासले सहअनेक मान्यवर, शेकडो विद्यार्थी पालक उपस्थित होते. 

या कार्यक्रमात बहुतांशी समाज बांधवांनी समाजाची दशा आणि दिशा व कथा आणि व्यथा या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले . गुणगौरव सोहळ्याचे आयोजन व नियोजन आदर्श माळी युवक मंडळ छत्रपती संभाजी नगरचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र धनवई सह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेऊन सुंदर असा गुणगौरव व समाजभूषण पुरस्कार सोहळा पार पाडल्याने सर्वत्र उत्साहात संपन्न केला .. आलेल्या सर्व प्रमुख  पाहुण्यांच्या हस्ते प्रारंभी दिपप्रज्वलन व प्रतिमापूजन करण्यात आले. प्रास्ताविक डॉ. राजेंद्र धनवई यांनी केले. तर सौ. रंजना डहाके व से. नि. डी. डी. लांडगे सर यांनी उत्कृष्ठ शैलीत सुत्रसंचलन केले. शेवटी सोहळ्याचे अध्यक्ष  चंद्रकांतजी बागुल यांच्या अध्यक्षीय गुणगौरवभाषनाने समारोप करण्यात आला. याप्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते किसान मोर्चाचे प्रांत सचिव कविवर्य एडवोकेट संभाजीराव पगारे यांचा सहपत्नीक मंत्री अतुलजी साने यांच्या हस्ते समाजातील प्रतिष्ठेचा समाजभूषण पुरस्कार सन्मानपत्र सन्मानाचिन्ह शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी त्यांचा पूर्ण परिवार सहभागी होता त्यांना मिळालेले या पुरस्काराबद्दल पिंपळनेर येथील पत्रकार राजेंद्र गवळी डॉक्टर राजेंद्र पगारे भाजपाचे प्रदीप कोठावदे नितीन कोतकर वसंतराव बच्छाव जिल्हा व तालुका तसेच पिंपळनेर शहर कार्यकारणीच्या सर्व सदस्यांनी पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे
close