shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

ऋणानुबंध कडून साई चरणी भजन सेवा अर्पण


राजेंद्र बनकर/ शिर्डी
आषाढी एकादशी आणि गुरुपोर्णिमेचे औचित्य साधुन ऋणानुबंध बहुउद्देशिय सामाजिक संस्थेकडून साईबाबा मंदीर शिर्डी येथे साईभजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात संस्थेच्या कलाकारांनी सुरेख भक्तीपुर्ण भजने सादर केली.
या भजन संध्या कार्यक्रमाची सुरवात प्रतिभा साबळे यांनी गजानना श्री गणराया या भक्तीगीताने केली. त्यानंतर विठु माऊली तु माऊली जगाची, साईनाथ तेरे हजारो हाथ, देव माझा विठु सावळा या गीतांबरोबरच प्रशांत बंडगर यांनी प्रभु तु दयाळु हे अत्यंत सुरेख भक्तीगीत सादर केले. तेरे घरके आगे साईनाथ, खेळ मांडियेला, रखुमाई रखुमाई, साईराम साईशाम अशा विविध भक्तीगीतांमुळे भजन संध्या भक्तीरसात रंगुन गेली. डॉ. विवेकानंद कंगे यांनी सादर केलेल्या तारिफ तेरी निकली है दिलसे या साईगीताला तर उपस्थित भक्तांनी छान प्रतिसाद दिला. संस्थेच्या उपाध्यक्षा सारिका रघुवंशी यांनी सादर केलेल्या एव्हरीबडी लव्स साई या गीताला प्रेक्षकांनी सोबत गात साथ दिली.
या कार्यक्रमात श्री साईबाबा संस्थान शिर्डी येथील मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर आणि साई संगम सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष संदीपभाऊ सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमात डॉ. विवेकानंद कंगे, प्रशांत बंडगर, शुभांगी ओहोळ, भानुदास महानुर, डॉ. उमेशचंद्र सुद्रीक, नीता माने, दुर्गा हुरे, कु. कर्डीले, रत्ना शिरसाळकर, प्रतिभा साबळे आणि सारिका रघुवंशी यांनी भक्तीगीते गायली.ऋणानुबंध संस्थेचे अध्यक्ष अजित रोकडे, सचिन परदेशी, महेश घावटे, योगिता कर्डिले यांनी आयोजनात मोठी मदत केली. चारुता शिवकुमार, डॉ. कंगे आणि भानुदास महानुर यांनी सुरेख आणि नेटके सुत्र संचालन केले.
वृत्त विशेष सहयोग,
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान, अहमदनगर, संकलन - समता न्यूज सर्व्हिसेस श्रीरामपूर - ९५६११७४१११
close