shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

एन.ई.एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक याची पुण्यतिथी साजरी.

एन.ई.एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर  येथे  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक याची पुण्यतिथी साजरी.
इंदापूर: निमसाखर एज्युकेशन सोसायटीचे, एन.ई.एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर ता. इंदापूर जिल्हा पुणे येथे आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक याची पुण्यतिथी विद्यालयामध्ये उत्साहात साजरा करण्यात आली. 
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे पर्यवेक्षक मधुकर शंकर खरात सर यांनी स्वीकारले होते. याप्रसंगी  विद्यालयातील सर्व स्टाफ उपस्थित होता. ज्येष्ठ शिक्षक चंद्रकांत  बोंद्रे सर, सूर्यकांत किसवे सर व प्रमोद चव्हाण सर यांनी प्रतिमेचे पूजन केले.
 यावेळी विद्यालयातील  मुलांनी व मुलींनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले.
 प्रमोद चव्हाण सर व अमोल रणवरे सर यांनी या महात्म्यांविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

संस्थेचे सचिव धनंजय  रणवरे व प्राचार्य चंद्रकांत रणवरे  यांनी विद्यार्थ्यांनी अशा महान समाज सुधारकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागाने केले तर सूत्रसंचालन आजिनाथ मलगुंडे सर यांनी केल्याची माहिती प्राचार्य चंद्रकांत रणवरे यांनी दिली.
close