अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त शेतकरी संघर्ष समिती व किसान सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने अण्णा भाऊं साठे यांच्या साहित्यावर आयोजित केलेल्या "खुल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेचे केले बक्षीस वतरण.
इंदापूर: अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त शेतकरी संघर्ष समिती व किसान सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने अण्णा भाऊंच्या साहित्यावर आयोजित केलेल्या "खुल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेत"शंभरहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला.
या स्पर्धेत गुणानुक्रमे पुढील स्पर्धकांना रोख बक्षिसे,प्रमाणपत्र,दोन पुस्तके देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.प्रथम -. अथर्व संजय कांबळे .(रोख 1100रू,प्रमाणपत्र,दोन पुस्तके)
द्वितीय- प्रतिक राजेंद्र होनमाने (रोख 700रू.प्रमाणपत्र दोन पुस्तके)
तृतीय-श्सुमीत सुधीर गायकवाड (रोख500रू.प्रमाणपत्र दोन पुस्तके)4.
उत्तेजनार्थ-प्रत्येकी 200रू.प्रमाणपत्र दोन पुस्तके
1श्री. .सूरज केशव साठे.
2.श्री. ऋषिकेश किरण गायकवाड. 3.कु.स्वरा राकेश कांबळे.
या प्रसंगी निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री. उदयसिंह पाटील,माजी सभापती श्री. प्रशांत पाटील यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमास सरपंच सौ.पल्लवी गिरमे,उपसरपंच श्री. रणजित घोगरे,राष्ट्रवादी पक्षाचे (अजित पवार)युवकचे राज्य उपाध्यक्ष श्री. संग्रामसिंह पाटील,श्री. अंकुश घाडगे,श्री. विक्रम तुकाराम घोगरे,श्री. विजय गायकवाड,श्री. लक्ष्मण गायकवाड,श्री. छगन गायकवाड ,ग्रामसेविका सौ.अंबिका पावशे इ.मान्यवर उपस्थित होते.
शेवटी सर्व उपस्थिताःचे आभार श्री. दत्तात्रय गायकवाड यांनी मानले.