.
अकोले तालुक्यातील कळस येथील शेतकरी कुटुंबातील पुंजा बापू वाकचौरे (वय 75) यांचे 5 ऑगस्ट रोजी आजाराने दुःखद निधन झाले. ते थोरले या नावाने सुपरिचित होते.
त्यांचे पश्चात मुलगा कळस गावचे माजी सरपंच, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाऊसाहेब वाकचौरे, मुलगी श्रीमती मनीषा बाळासाहेब वाडेकर, पत्नी, नातवंडे असा परिवार आहे.
कळस बु येथील स्मशानभूमी मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.