"शाहू विद्यालयात नागपंचमी
"कवितेचे प्रभावी सादरीकरण
प्रतिनिधी हारुन शेख / पैठण
सुप्रसिध्द बाल साहित्यिक अय्युब पठाण लोहगावकर यांनी शाहू विद्यालय जायकवाडी (उत्तर) ता. पैठण येथील शाळेत नागपंचमी सणानिमित्त मार्गदर्शन करतांना सांगितले की, " सर्प हा शेतकऱ्याचा मित्र असून शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पेरलेल्या बी. बीयाणेंना उंदीरे खाऊन नष्ट करतात अशावेळी सर्प हा त्या उंदीरांपासून होणाऱ्या नुकसान बचावणीकरीता मोठी महत्वाची भुमिका बजावतात,करीता सर्फ हा शेतकऱ्यांचा मित्र असल्याचे सुप्रसिद्ध बाल कवी अय्युब पठाण लोहगावकर यांनी सांगितले.
या प्रसंगी विद्यालयातील मुख्याध्यापक शंकरराव वाघमोडे यांच्यासह विद्यालयातील शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना श्री. पठाण म्हणाले की, नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया ह्या वारूळाची पूजा करतात. मराठी सणांची सुरुवात ही श्रावण महिन्याच्या पाचव्या दिवशी येणाऱ्या नागपंचमीपासून होते, ग्रामीण भागात नागपंचमी सण हा मोठ्या उत्साहात साजरा केला जाते. असेही ते म्हणाले.
"यावेळी कवी अय्युब पठाण यांनी आपल्या मधूर आवाजात
"चल गं सये वारूळाला
नागोबाला पुजायला
हळदकुंकू वाहायला
ताज्या लाह्या वेचायाला."
ही कविता गाऊन दाखविली.याचा विद्यार्थी व शिक्षक वृंद यांनी मोठा आनंद घेतला.
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस श्रीरामपूर - ९५६११७४१११