शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
सामाजिक बातमी
भारतीय जनता पार्टी सोनई गट व भारतीय जनता पार्टी लोहगाव चे ज्येष्ठ नेते व कार्यसम्राट जय हरी आमदार बाळासाहेब मुरकुटे पाटील यांचे खंदे समर्थक व आमचे मार्गदर्शक श्री कुशिनाथ (आप्पा) ढेरे पाटील यांचा वाढदिवस मोठा डामडौल न करता जि प प्रा शाळा लोहगाव येथील शाळेतील गरजू गोरगरीब मुलांना शालेय साहित्य देऊन व संरपंच पांडुरंग वाघ यांच्या वतीने वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला
शाळेतील विद्यार्थ्यांना वही, पेन, सिस पेन्सिल, खोड रबर ,व खाऊचे वाटप केल्याने सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून आप्पांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व आरोग्य उत्तम राहो अशी ईश्वराकडे प्रार्थना केली.
जि. प.प्रा. शाळा लोहगाव च्या वतीने त्याचा सन्मान करण्यात आला.
समाजात गोरगरीब विद्यार्थ्यांच्या हातामध्ये शालेय वस्तू पैसे अभावी घेता येत नाही त्यांना एक प्रकारे शिक्षणाची आवड लागावी व साक्षरता होण्यासाठी खरी गरज आज लहान मुलांना असल्याचे भारतीय जनता पार्टीचे समर्थक व ज्येष्ठ नेते कुशिनाथ (आप्पा) ढेरे पाटील यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रम प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेबजी फुलारी साहेब, शरदभाऊ जाधव (जेऊर हैबती), अरुण भाऊ चांदघोडे ,संभाजीराजे गडाख, शरद भाऊ तोडमल , नानाभाऊ ढेरे ,सनी भाऊ शिरसाठ, सोपान पाटील (पोलीस पाटील),ऋषिकेश पटारे, रविभाऊ शिंदे ,भाऊराव नागदे , संभाजी राशीनकर , बापूराव तनपुरे , पानसवाडीचे युवा नेते विशालभाऊ धनगर , शाळेतील शिक्षक , शिक्षिका व इतर सर्व ग्रामस्थ कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते.