shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

इंदापूर महाविद्यालयामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना अभिवादन*

*इंदापूर महाविद्यालयामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य  टिळक यांना अभिवादन* 
   इंदापूर: इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात आज दिनांक  01 ऑगस्ट  2024 रोजी लोकशाहीर  अण्णा भाऊ साठे  यांची जयंती साजरी करण्यात आली.  तसेच  लोकमान्य टिळक  यांच्या  पुण्यतिथीनिमित्त  त्यांना  अभिवादन करण्यात आले.     
      लोकशाहीर म्हंटले की  साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे आठवतात . महाराष्ट्राची  शान  व बहूजणांचा  आण  म्हणजे लोकशाहीर होते. त्यांचे  कार्य  समजल्यावर  माणसाना  जगण्याचा अर्थ  कळतो. कामगारांना त्यांचे  अधिकार  कळतात असे मत  प्राचार्य डॉ.जीवन सरवदे  यांनी मांडले.ज्या  प्रमाणे  लोकशाहीर  यांचे कार्य आहे त्याच  प्रमाणे लोकमान्य  यांचे कार्य  समाजाला  दिशा  देणारे आहे . प्रत्येक  महापुरुष हे त्यांच्या  कर्म व कार्याने  समाजातील  तरुणांना  नवीन  विचार  देतात असेही ते म्हणाले.  
     यावेळी डॉ. शिवाजी वीर, डॉ.भिमाजी भोर व डॉ. एस.एन.पवार यांनी अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या विचारांची व कार्याची माहिती दिली.
    उपप्राचार्य प्रा.दत्तात्रय गोळे , कार्यलयीन प्रमुख अभिमन्यू भंडलकर  व महाविद्यालयातील  सर्व  प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी  यावेळी उपस्थित होते.
     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तानाजी  कसबे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रा.उत्तम माने  यांनी मानले.
close