अहमदनगर जिमाका वृत्तसेवा:
नेवासा तालुक्यात जप्त करण्यात आलेल्या मौजे सुरेगाव गंगा,घोगरगांव तसेच मौजे बोरगांव येथे वाळू साठ्यांचा लिलाव अटी व शर्तीच्या अधिन राहुन दि.९ ऑगस्ट २०२४ रोजी सायं. ४.०० वाजता तहसिल कार्यालय, नेवासा येथे आयोजित करण्यात आला आहे. इच्छुकांनी अनामत रक्कम भरुन लिलावात सहभागी होण्याचे आवाहन उप विभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
मौजे सुरेगांव येथे अनाधिकृत असा १२५ ब्रास रेतीसाठा आढळून आला असुन मौजे घोगरगांव येथे ५० ब्रास तर मौजे बोरगांव येथे ३० ब्रास अनाधिकृत असा रेतीसाठा आढळून आला आहे. लिलावाच्या अटी व शर्ती तहसिल कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, नेवासा येथे उपलब्ध असुन इच्छुकांनी या लिलावात सहभाग नोंदवावा, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११