कोणाला गोड तर कोणाला मी कडु लागलो
पत्थरातला देह माझा लेखणीने मी घडु लागलो
ईथे आपले काहीच नाही मी ही माझा नाही राहीलो
हसत हसतच नात्यांत आतल्या आत रडु लागलो
चालतो मी एकटाच ह्या परीवर्तणाच्या रस्त्यावरुन
विचारांना विचारांशी बांद घालुन जोडु लागलो
मळलेल्या वाटेवरुन मला चालायचे नव्हतेच कधिच
एक दुनिया माझी आहे तरी दुनियेदारीत पडु लागलो
ह्या गॅलेक्सीच्या सातबार्यावर फेरफार माझाच आहे
एका हाताने सुर्य तर दुसर्या हाताने चंद्र तोडु लागलो
पुसली जाईलही माझी वहीवाट एक दिवस येईलही
मीच आता माझ्याशी बिनधास खेळुन नडु लागलो
मी माझ्या पत्यावर अन बाहुपाषातही रहात नाही हल्ली
माझ्याच विचारांना मीच नडुन जिंदगीशी नडु लागलो
माणसे वाचली मी माझ्या विचारांच्या चश्म्याने
एक एक करुन मुखवटे माझी सर्व फाडु लागलो
आकाशसुपारे.
9822510254