shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

' म्युझिक लव्हर्स ग्रुप ' च्या वतीने गायक स्व . किशोर कुमार यांचा ९५ वा वाढदिवस साजरा' ...


' म्युझिक लव्हर्स ग्रुप ' ने केली बहारदार गीते प्रस्तुत ....

प्रतिनिधी : संजय वायकर

नगर : दि . ५ /    बॉलीवूडचे सर्वोत्कृष्ट गायक आणि अभिनेते स्व . किशोर कुमार  यांचा ९५ वा वाढदिवस ' म्युझिक लव्हर्स ग्रुप ' च्या वतीने नगर येथील चितळे रोड च्या रंगार गल्ली येथे उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित गायकांनी किशोरदा यांची गीते गाऊन आनंद व्यक्त केला .

 बॉलीवूडच्या एका सुवर्णकाळावर अधिराज्य गाजवणाऱ्या कलाकारांमध्ये किशोर कुमार यांचं नाव अगदी अग्रस्थानी घेतलं जातं. त्यांची गाणी, त्यांचा अभिनय हा अगदी आज्जी आजोबांच्या काळापासून ते आताच्या तरुण पिढीला देखील तितकाच पसंतीस उतरतो हे विशेष. किशोर कुमार हे त्यांच्या कामामुळे नेहमीच चर्चेत राहिले .

 किशोर कुमार यांचा जन्म ४ ऑगस्ट १९२९ रोजी मध्य प्रदेशातील खंडवा येथे झाला. त्यांची गणना हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्यांमध्ये केली जाते. आपल्या अभिनय आणि गायननाने किशोर कुमार यांनी चाहत्यांवर अधिराज्य गाजविले .

सदर कार्यक्रमात रिमझीम गीरे सावन , अश्विनी येना , दिये जलते है , थोडीसी जो पि ली है , बने चाहे दुश्मन जमाना हमारा, वादा करो नही छोड़ेंगे तेरा साथ , कोरा कागज था ये मन मेरा , आ पेहली बार ... आदि बहारदार गीते प्रस्तुत करण्यात आली.

यावेळी किरण वैकर , विनय गुंदेचा , मनिष मुथ्था , राजु शित्रे , सुनिल भंडारी , पंढरीनाथ लांडगे , किशोर बनसोडे , संजय वायकर आदि गायक उपस्थित होते .
close