शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
सामाजिक बातमी
डीबीटीसी योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2024 -2025 साठी शासनाने नेनो खत,व नेनो युरिया साठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन फॉर्म भरण्यास सांगितली होते अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाइन नॅनो युरिया व नेनो डीएपी खतासाठी ऑनलाईन फॉर्म भरले होते चिचोंडी पाटील आणि पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर मोफत नॅनो डीएपी खत व नेनो युरिया खत मिळाले, या खतांचे वाटप भाजपा पंचायत राज व ग्रामविकास विभागाचे उत्तर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष बबनराव शेळके आणि कृषी अधिकारी पवार साहेब यांच्या हस्ते सर्व शेतकऱ्यांना वरील खाते मोफत देण्यात आली.
यावेळी बबनराव शेळके यांनी शेतकऱ्यांनी केंद्र व राज्य शासनाच्या शंभर टक्के योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले. शासन सदैव आपल्या पाठीशी आहे आणि शंभर टक्के आपल्याला मदत करणार आहे असेही शेळके यांनी यावेळी म्हटले आहे यावेळी शासनाचे शेतकऱ्यांनी आभार मानले , यावेळी आबासाहेब वाडेकर ,संभाजी खडके, संतोष शेळके, राजेंद्र तनपुरे, विष्णू भद्रे ,विष्णू दाताळ ,प्रकाश तनपुरे, संतोष कोकाटे ,शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता