श्रीरामपूर प्रतिनिधी:
विद्यार्थी हा या देशाचे उज्ज्वल भविष्य असून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा आणि मैदानी खेळाकडे पालकांनी लक्ष द्यावे, अशी अपेक्षा लोकनेते माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केले.
श्रीरामपूर तालुक्यातील अशोकनगर येथील रयत शिक्षण संस्थेच्या भास्करराव गलांडे पाटील विद्यालयाचा शैक्षणिक वर्ष २०२४ मधील पालक मेळावा नुकताच संपन्न झाला. या पालक मेळाव्याचे अध्यक्ष माजी आमदार व व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लोकनेते भानुदास मुरकुटे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अशोक सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन हिम्मतराव धुमाळ, स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य, माजी चेअरमन सोपानराव राऊत, संचालक ह. भ. प. काशिनाथ गोराणे (बाबा), कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. सुनीताताई गायकवाड हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कर्मवीर भाऊराव पाटील आणि भास्करराव गलांडे पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या शुभहस्ते झाले. यावेळी श्रीमती यादव जी.एस. यांनी कार्यक्रमांच्या अध्यक्षीय निवडीची सूचना मांडली. या निवडीला श्रीमती उंडे जे.डी. यांनी अनुमोदन दिले. आपल्या प्रास्ताविकातून विद्यालयाचे मुख्याध्यापक देवराम वडीतके यांनी विद्यालयामध्ये चालणाऱ्या शैक्षणिक व पूरक उपक्रमांची माहिती मान्यवर आणि पालकांना माहिती दिली. याप्रसंगी विद्यालयाचे उपशिक्षक सूर्यकांत सराटे यांनी विद्यालयाच्या गुणवत्ता व शैक्षणिक वाढीसाठी पालकांनी शिक्षकांप्रमाणेच लक्ष द्यावे याकडे लक्ष वेधले. या निमित्ताने सदाभाऊ कराड, कुदरत शेख, डॉ. मंगेश उंडे, कृष्णा बडाख, वर्षाताई घाडगे या पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायकवाड आर. पी. व सूर्यकांत सराटे यांनी केले तर आभार दिलीप बनकर यांनी मानले.
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११