श्रीरामपूर / प्रतिनिधी:
राष्ट्रीय संघर्ष समितीच्यावतीने येत्या रविवारी ११ ऑगस्ट २०२४ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन टिळक रोड अहमदनगर येथे भव्य पेन्शनर्स मेळावा आयोजित करण्यात आला असून या मेळाव्यात नवी दिल्ली जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनाची सविस्तर माहिती देण्यात येणार असून या मेळाव्यात अहमदनगर जिल्ह्यातील नवनिर्वाचित खासदार निलेश लंके व खा भाऊसाहेब वाकचौरे यांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे.
तरी या मेळाव्यात अहमदनगर जिल्हा व परिसरातील सर्व पेन्शन धारकांनी उपस्थित राहावे असे आवाहन पश्चिम भारत संघटक सुभाष पोखरकर, जिल्हाध्यक्ष संपत समिंदर, महिला अध्यक्ष आशाताई शिंदे,संजय मुनोत,त्र्यंबकराव देशमुख,भगवंत वाळके, दशरथ पवार,दिलीप थोरात, बापूराव बहिरट, राधाकृष्ण धुमाळ,नवाज शेख सुलेमान शेख,,आदींनी केले आहे.
वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे, शिरसगाव
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११