shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

बाहेर नेलं की मुलं जास्तच हट्ट करतात?*

*बाहेर नेलं की मुलं जास्तच हट्ट करतात?*
इंदापूर: सध्या सर्व पालकांना भेडसावणारा प्रश्न म्हणजे बाहेर नेलं की मुलं जास्तच हट्ट करतात? असे केल्याने पालक मुलांना मारतात,रागावतात,धमकी देतात असे केल्याने  मुलं जास्तच चिडखोर बनतात.
           सार्वजनिक ठिकाणी मुलं रडारड करत असतील किंवा ऐकत नसतील तर तुम्ही सोप्या टिप्स वापरून मुलांना शांत करू शकता...

१)मुलांवर लक्ष द्या,पब्लिकवर नाही-बाहेर गेल्यावर बहुतांश पालक इतर लोक काय म्हणतील याचा विचार करून सर्वांसमोर आपल्या मुलांवर ओरडतात जे पूर्णपणे चुकीचे आहे.मुलांना व्यवस्थित समजावून सांगा. बाहेर जाण्याच्या अगोदर मुलांना कल्पना द्यावी.
२)मुलांना कम्फर्ट फील करून द्या--जेव्हा मुलं रडतात,त्यांना प्रेमाने समजावून सांगा, त्यांना मिठी मारून शांत करण्याचा प्रयत्न करा.
३)मुलांवर ओरडू नका--मुलांनी हट्ट केला तर सर्वांसमोर त्यांच्यावर  न ओरडता त्यांना शांतपणे समजावून सांगावे,संवाद साधावा.
४)मुलांसोबत मनमोकळ्या गप्पा माराव्यात,त्यांना विचारात घ्यावं,घरातील वातावरण प्रसन्न ठेवावे,मुलांना श्रमाचे व बचतीचे महत्व सांगावे,मुलांवर मूल्य,संस्कार रुजवावेत.
५)मुलांना श्रीमंत बनायला शिकवू नका,त्यांना आनंदी कसे जगायचे हे शिकवा कारण अतिशय कष्टातून तुम्ही त्याला दिलेली वस्तूची प्राईज त्याला कळून उपयोग नाही तर त्या वस्तूची व्हॅल्यू त्याला कळायला हवी.

..........भारत ननवरे(मुख्याध्यापक जि.प.प्राथमिक शाळा कौठळी,ता.इंदापूर, जि.पुणे )
close