शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
सामाजिक बातमी
चार वेळा मूळव्याधाचे ऑपरेशन करून अनेक ठिकाणी उपचार घेऊन वेदनांनी त्रस्त असलेल्या ५० वर्षीय रुग्णावर डॉ. किरण गोरे यांनी लेझरद्वारे उपचार करून रुग्णाला वेदनांपासून दिलासा दिला आहे. मूळव्याध तज्ञ डॉ. किरण गोरे यांच्याकडे असलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधा, त्यांची शस्त्रक्रिया करण्याची कार्यपध्दत यामुळे विविध राज्यांतून मूळव्याध, अपेंडिक्स, हर्निया, व्हेरिकोज व्हेन्स, आतड्यांच्या विविध शासकीय व इतर विविध आजारांवर उपचार घेण्यासाठी रुग्ण त्यांच्याकडे येतात. संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथील अनेक महिन्यांपासून मूळव्याध आजाराने त्रस्त असलेल्या व ४ ऑपरेशन करूनही रुग्णाला पोट साफ होण्यास खूप त्रास व असह्य वेदना होत होत्या. अनेक हॉस्पिटलमध्ये उपचार केल्यानंतरही काहीच फरक झाला नाही म्हणून पुणे येथे उपचार करण्यासाठी सांगितले. परंतु आर्थिक परिस्थितीमुळे उपचार घेता आले नाही. हताश झालेल्या रुग्णाला मूळव्याध तज्ञ डॉ. किरण गोरे यांच्याकडे जाण्याचा सल्ला मिळाला. डॉक्टरांनी लेजर उपचारानंतर आजार पूर्णपणे बरा होईल, असा विश्वास रुग्णाला देऊन या रुग्णावर लेझर ऑपरेशन करून सीव्हीआर एनल स्टेनोइसिस या आजारातून रुग्णाला मुक्त केले आहे. याप्रसंगी पेशंट म्हणाले की, मला राहता येतील डॉक्टर गोरे यांनी माझे लेझर द्वारे ऑपरेशन करून त्रासांपासून मुक्त केले आहे मी या आजारामुळे सहा महिन्यापासून त्रासात होतो. मला उशिराने डॉक्टर गोरे यांचा पत्ता मिळाला नाही तर मी अगोदरच त्रासातून मुक्त झालो असतो.