shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

श्री संतुकनाथ विद्यालयातील विद्यार्थ्यांची व्यसनमुक्ती जनजागृती


अहमदनगर /  प्रतिनिधी:
अहमदनगर तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या जेऊर येथील श्री संतुकनाथ विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या व्यसनमुक्ती जनजागृती पथयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या व्यसनमुक्ती जनजागृतीचे पथयात्रेचे आयोजन प्राचार्य सिद्दिकी ए. एन. यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.

यावेळी जेऊर गावातील बाजारपेठेत व्यसनमुक्ती निमित्त आयोजित केलेल्या सभेत प्राचार्य सिद्दिकी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, समाजातील काही व्यक्तींना वेगवेगळ्या प्रकारच्या व्यसनांनी गंभीरपणे विळखा घातला असून या व्यसनांपासून नागरिकांनी दूर व्हावे आणि आपल्या आरोग्य व कुटुंबाकडे लक्ष द्यावे, असा संदेश दिला. यावेळी विद्यार्थ्यांनी आठवडे बाजारात जाऊन व्यसनांमुळे ग्रामस्थांच्या आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांची आपल्या संदेशातून जाणीव करून दिली. जेऊर गावातील आठवडेे बाजारातील ग्रामस्थांनी या उपक्रमाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. नंतर विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी ग्रामस्थांसह आठवडे बाजारात व्यसन न करण्याची शपथ दिली. ग्रामस्थांना मी दारू पिणार नाही, मी दारू पिऊन गाडी चालवणार नाही, मी दारू पिऊन घरात मुलांना व बायकोला मारणार नाही, पान टपरीवर मावा, तंबाखू, गुटखा खाणार नाही, आपल्या स्वतःच्या संसाराकडे, व्यवसायाकडे, मुलांकडे, कुटुंबाकडे पूर्णपणे लक्ष देईल, मी माझे आरोग्य उत्तम सांभाळील, अशी शपथ दिली. यावेळी श्री.बोरुडे सर, सौ. गाडेकर, सौ शेलार यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संकलन,समता न्यूज सर्व्हिसेस श्रीरामपूर - ९५६११७४१११
close