shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी च्या दोन विद्यार्थ्यांचे राष्ट्रस्तरीय GPAT व NIPER परीक्षेत यश

एरंडोल- शास्त्री फाउंडेशन संचलित शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी पळासदळ, एरंडोल येथील दोन विद्यार्थी राष्ट्र स्तरीय GPAT व NIPER परीक्षेत यश संपादन केले आहे. जागतिक स्तरावर नावाजलेले राष्ट्रीय औषधी शिक्षा संशोधन संस्था यांचे (नायपर) यांचे देशभरात सात संस्था असून या सर्व संस्था औषध निर्माण शास्त्र शाखेत संशोधनासाठी ओळखल्या जातात. सर्व संस्थांमध्ये एम. फार्म, एम. टेक, एम. एस साठी प्रवेश परीक्षा घेतली जाते.     

वैष्णवी सोनार (207)

           या परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया रँक उत्तम असेल त्यांना प्रवेश दिला जातो. त्याच प्रमाणे राष्ट्र स्तरीय GPAT ही परीक्षा घेतली जाते त्यात देखील जे विद्यार्थी उत्तीर्ण होतात त्यांना एम. फार्म साठी प्रवेश दिला जातो. शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी एरंडोल मधील दोन विद्यार्थ्यांनी पवन राधेश्याम दमदार (224) व वैष्णवी सोनार (207) गुणांनी यश संपादन केले. तसेच वैष्णवी सोनार ही NIPER परीक्षा सुद्धा उत्तीर्ण झालेली आहे. 

               महाविद्यालयात औषध निर्माण शास्त्र क्षेत्राशी निगडित असलेल्या स्पर्धा परीक्षांची विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेतली जाते तसेच औषध निर्माण शास्त्र क्षेत्राशी असलेल्या स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शनपर तज्ञांना बोलावून मार्गदर्शन दिले जाते. यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य तथा संस्थापक अध्यक्ष डॉ. विजय शास्त्री, सचिव सौ. रूपा शास्त्री, उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले

close