shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

श्री साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीला जीवन गौरव पु 2024 चे पुरस्कार


शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन )
 सामाजिक बातमी

दैनिक प्रहार परिवाराच्या वतीने साईबाबांच्या शिर्डीत हॉटेल साई संगम येथे प्रहार रत्न व प्रहार जीवनगौरव पुरस्कार 2024 सोहळा थाटात संपन्न झाला या सोहळ्यासाठी मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे अभिनेते मकरंद अनासपुरे तसेच श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांची प्रमुख उपस्थिती होती या नेत्रदीपक सोहळ्यात समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते तर विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणाऱ्या सामाजिक,राजकीय,धार्मिक,पत्रकारिता,क्रीडा,वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांना व महिला रण रागीनिंना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

राज्यात नावाजलेली तसेच अहिल्यानगर जिल्ह्यात अग्रणी असलेली शिर्डीतील श्री साईबाबा संस्थानच्या कर्मचाऱ्यांची कामधेनू म्हणून ओळखली जाणारी साई संस्थान एम्प्लॉइज क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या संचालक मंडळाला साई भक्तांच्या सुविधेसाठी देण्यात येणारी सेवा,अत्यल्प दरात उत्तम प्रसाद विक्री तसेच सहकार क्षेत्रातील उत्तुंग कार्याबद्दल सिने अभिनेते मकरंद अनासपुरे व श्री साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते राज्यस्तरीय प्रहार जीवनगौरव पुरस्कार देत गौरविण्यात आले.
       याप्रसंगी पुरस्कार घेण्यासाठी चेअरमन विठ्ठल पवार,व्हा चेअरमन पोपटराव कोते पाटील तसेच संचालक मंडळ उपस्थित होते.
close