राज्यस्तरीय कुराश स्पर्धेमध्ये एल. जी बनसुडे इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेज पळसदेव मधील जगदीश भारत तोंडे याने 65 किलो मध्ये प्रथम.
हिमाचल प्रदेश या ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये निवड झाली असून त्या स्पर्धेसाठी आज महाराष्ट्र टीम बरोबर रवाना .
इंदापूर: पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय कुराश स्पर्धेमध्ये गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एल. जी बनसुडे इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेज पळसदेव मधील जगदीश भारत तोंडे याने 65 किलो मध्ये प्रथम क्रमांक मिळवून हिमाचल प्रदेश या ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये निवड झाली असून त्या स्पर्धेसाठी आज महाराष्ट्र टीम बरोबर रवाना झाला. त्याबद्दल त्यांचे व मार्गदर्शक शिक्षक दत्तात्रय व्यवहारे सर व पालक भारत तोंडे यांचे कुराश असोसिएशन ऑफ महाराष्ट्र सचिव शिवाजी साळुंखे सर तसेच संस्थेचे अध्यक्ष आदरणीय. श्री हनुमंत (नाना) बनसुडे, कार्याध्यक्षा नंदाताई ( नानी) बनसुडे,सचिव नितीन बनसुडे. प्राचार्या. वंदना बनसुडे,मुख्याध्यापक. श्री. राहुल वायसे तसेच सर्व विभाग प्रमुख. पालक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले...