इंदापूर: डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा ५ सप्टेंबर शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसी निर निमगाव येथील अनंतराव पवार विद्यालय येथे शिक्षक दिन इयत्ता सहावी व दहावीच्या वर्ग शिक्षक व विद्यार्थी यांनी आयोजन व नियोजन करून साजरा केला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इयत्ता दहावीच्या संचिता जाधव व सुप्रिया निकम या विद्यार्थिनींनी केले.
यावेळी संस्थेच्या विश्वस्त शोभाताई घोगरे व कु. साक्षी कचरे यांनी डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार घातला तसेच सौ शोभाताई घोगरे यांनी दोन्हीही विद्यालयातील शिक्षक व शिक्षक शिक्षिकांना पुष्पगुच्छ देऊन सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी सर्व गुरुजनांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आणि संपूर्ण दिवस अध्यापनाचे कामकाज करून ५ सप्टेंबर शिक्षक दिन साजरा केला.
याप्रसंगी मकर मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब गरगडे यांनी शिक्षकांना शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांचे कौतुक केले या कार्यक्रमास दोन्हीही विद्यालयाचे सर्व शिक्षक शिका आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.