shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

नरेंद्र मोदीजी विश्वगुरू

 

नरेंद्र मोदीजी सारखा धुरंधर, प्रखर राष्ट्रवादी तीन वेळा पंतप्रधान अजून तरी देशात झाला नाही अगर होणार ही नाही अश्या ह्या महान नेत्याचा आज 17 सप्टेंबर हा आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ह्यांचा 74 वा वाढदिवस त्यानिमित्ताने थोडक्यात आढावा..

"मैं नरेंद्र दामोदरदास मोदी, ईश्वर की शपथ लेता हूँ.... दि. २६ मे, २०१४ साली राष्ट्रपती भवनातल्या दिमाखदार सोहळ्यात हा भारदस्त आवाज घुमला...प्रखर राष्ट्रवादी हिंदूंचे नेतृत्व म्हणून नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहत असलेल्या भारतीय जनतेने २०१४ मध्ये त्यांना संपूर्ण बहुमताने देशाच्या पंतप्रधानपदी बसवले आणि त्याची पुनरावृत्ती २०१९, २०२४ च्या निवडणुकीत देखील झाली. कोट्यवधी लोकांच्या मनात एक विश्वास निर्माण झाला आणि लाखो कार्यकर्त्यांनी जागेपणी पाहिलेलं स्वप्न साकार झालं.
     17 सप्टेंबर1950 रोजी अश्या या महान नेत्याचा जन्म गुजरात मध्ये गरीब कुटुंबात झाला, लहान वयात गरिबीची झळा सोसून सामन्याचे दुःख, हालअपेष्टा जवळून बघुन आपले जीवन राष्ट्रासाठी अर्पण करण्याचे उदात्त हेतूने भारतभर "जम्मू कश्मीर ते कन्याकुमारी " देशाची परिक्रमा करून ,भारतीय जनता पार्टीचे माध्यमातून कार्यकर्ता ते सरोउत्तम नेता असा जीवन प्रवास करणारे स्व. पंतप्रधान अटलजी बिहारी वाजपेयी नंतर दुसरे पंतप्रधान.
      नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि २६ मे २०१४ पासून स्वतंत्र भारताचे १५ वे पंतप्रधान आहेत. ते २००१ पासून २०१४ पर्यंत गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते. २००९ लोकसभा निवडणुकीसाठीही ते भाजपचे कूटनीतिज्ञ होते. मोदी हे हिंदुत्ववादी विचारसरणीचे नेते आहेत व संघाचे स्वयंसेवक आहेत.

        या पदावर पोहोचणारे रा.स्व.संघाचे ते पहिले प्रचारक तर दुसरे स्वयंसेवक होत. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर जन्मलेले ते भारताचे पहिले पंतप्रधान आहेत. ते भारताचे अतिशय प्रभावी पंतप्रधान आहेत. जनतेशी थेट संवाद करणारे ते पहिलेच पंतप्रधान आहेत. भारतात आमूलाग्र बदल करण्याचे स्वप्न ते पुरेसे योगदान देऊन सार्थ करत आहेत.
     वयाच्या आठव्या वर्षी ते आरएसएसमध्ये सामील झाले, ज्यांच्याशी ते दीर्घकाळ संबंधित होते. पदवीनंतर त्यांनी आपले घर सोडले. मोदींनी दोन वर्षे भारतभर प्रवास केला आणि अनेक धार्मिक केंद्रांना भेटी दिल्या. १९७९ किंवा १९७० ते गुजरातमध्ये परतले आणि अहमदाबादला गेले. १९७१ मध्ये ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्ण-वेळ कार्यकर्ते झाले. १९७५ मध्ये आपत्कालीन परिस्थितीत त्यांना काही काळ लपावे लागले. १९८५ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि २००१ पर्यंत त्यांनी पक्षाच्या पदानुक्रमात अनेक पदे भूषवली, तेथून हळूहळू ते भाजपाच्या सचिव पदावर गेले. संघाचे प्रचारक ते भाजपाचे राष्ट्रीय महासचिव, गुजरात मध्ये 1990 नंतर राजकारणात सक्रीय होऊन सलग तीन वेळा मुख्यमंत्री होण्याचा विक्रम आणि गुजरातला देशात विकासाचे पहिल्या क्रमांकावर नेण्यासाठी प्रयत्न करणारे एकमेव नेते, बोलून नाही करून दाखवणारा माणूस हीच त्यांची ख्याती  झाली. गरिबीचा मुलगा देशाचा पंतप्रधान होऊन त्याचे कार्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची प्रगती आणि प्रतिष्ठा ह्या विचारात घेऊन आपल्या धोरणांनी देशाला जगात वेगळे स्थान निर्माण करण्याचे काम करणारे एकमेव पंतप्रधान म्हणून त्याचा गौरव होतोय. चीन,पाकिस्तान सारख्या शत्रूची नाकेबंदी करून देशाला जगाच्या नकाशात वेगळे स्थान निर्माण करून देणारे जागतिक नेते म्हणून त्याचा गौरव करण्यात आला.
देशातील गरिबी हटाव, शेतकऱ्याना सन्मान म्हणून 6000 रुपये सरसकट देण्याचे काम भारत देशाचे इतिहासात प्रथमतः करणारे एकमेव नेते, काश्मीर बाबत असेलेले 370 कलम हटून अनागोदी बंद करून कश्मीरचा विकास करण्यासाठी मोठे पाऊल टाकले, NRC सारखा कायदा पास करून बांगलादेशी घुसखोरी रोखण्यासाठी कडक पाऊल उचलले, मुद्रालोन मार्फत कोट्यवधी लोकांचे परिवार स्वतःचे पायावर उभे करण्यासाठी प्रयत्न यशस्वी केला, पंतप्रधान जीवदायी योजना मार्फत कोट्यवधी गरीबाना मोफत आरोग्याच्या सुविधा, बचत गटांना प्राधान्य देऊन स्त्री सबलीकरण, सुकन्या योजना, स्त्री शिक्षण,जनधन योजनेतून गरिबीच्या बँक खात्यात थेट मदत, ते आधार कायदा मंजूर करून हजारो कोटी रुपयांचा शासकिय निधीचा भ्रष्टाचार थांबवला, गरिबांना मोफत गॅस,आत्मनिर्भर भारत योजनेत स्वदेशी मालाचा वापर, स्किल इंडिया मार्फत उद्योग निर्मिती, कोट्यवधी घरे बांधून नवा भारत देश उभारणीचे काम अश्या अनेक योजना देशाला सदृढ ,सशक्त बनवण्यासाठी ज्यांनी केले ते एकमेव अजोड व्यक्तिमत्त्व होय.  
       प्रधानमंत्री उज्ज्वला योजने’तंर्गत आठ कोटींपेक्षा जास्त महिलांना मोफत घरगुती एलपीजी गॅसजोडणी दिले.

   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागील दहा वर्षांच्या कालखंडात काश्मीर आणि पंजाबमधील उरी येथील दहशतवादी हल्ला अपवाद वगळता देशात मुंबई, महाराष्ट्रासह कुठेही अतिरेकी हल्ला झालेला नाही. . नाहीतर मागील संपुआ सरकारच्या काळात दिवाळीत जसे फटाके फोडतात, तशा पद्धतीने अतिरेकी हल्ले होत असत. पण, मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर दहशतवादी हल्ल्यांना खीळ बसली. 
मोदी सरकारने पहिल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात गरीब जनतेच्या लोककल्याणासाठी, त्यांना सामाजिक, आर्थिक स्थैर्य देण्याच्या उद्देशाने विविध योजना राबविल्या. या योजनांमधून देशातील सामाजिक, आर्थिक विषमता कमी करण्यासाठी मदत झाली. त्याचबरोबर देशाच्या सुरक्षेसाठी देशाचे नेतृत्व खंबीर आहे, हे मोदी सरकारने आपल्या निर्णयांतून वेळोवेळी दाखवून दिले. आता दुसर्‍या कार्यकाळात गेली अनेक दशके खितपत पडलेल्या समस्या सोडवण्यात मोदी सरकार यशस्वी झाले आहे. त्यात ‘कलम ३७०’, राम मंदिर, तिहेरी तलाक, ‘सीएए’ आणि ‘एनआरसी’ सारखे अनेक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय मागील दोन वर्षांत घेतले गेले. ‘कलम ३७०’मुळे काश्मीरचे विभाजन होऊन लडाख हा स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश नकाशावर आला. काश्मीरमधून ‘कलम ३७०’ हटवले तर रक्ताचे पाट वाहतील म्हणणार्‍या लोकांच्या नाकावर टिच्चून रक्ताचा थेंबही न सांडता ‘कलम ३७०’ ला श्रद्धांजली देण्यात आली. ५०० वर्षांपासून प्रलंबित असलेला रामजन्मभूमीचा मुद्दाही मार्गी लागला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिरात रामप्रभूची मूर्ती स्थापना केली. हिंदू धर्माचे प्रतीक प्रभू रामचंद्र यांच्या अयोध्या येथील मंदिराचा कळस देखील आदरणीय मोदीजींच्या हस्तेच चढला
      पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपॉस्टल,फ्रान्स लष्करी किंवा नागरी आदेशांमधील सर्वोच्च फ्रेंच सन्मान, ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर प्रदान केले. हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळवणारे पंतप्रधान मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत.इजिप्तचा सर्वोच्च राज्य सन्मान 'ऑर्डर ऑफ द नाईल' पुरस्कार मिळाला. 
 भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, 'ऑर्डर ऑफ द ड्रुक ग्याल्पो' ने सन्मानित करण्यात आले. पहिले विदेशी सरकार प्रमुख बनले. 
        फिजीचा सर्वोच्च सन्मान, कम्पॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजीने सन्मानित करण्यात आले.
पापुआ न्यू गिनी (PNG) चा सर्वोच्च नागरी पुरस्कार ग्रँड कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू (GCL) ने सन्मानित करण्यात आले.
रिपब्लिक ऑफ पलाऊचा 'इबाकल पुरस्कार' पलाऊ मिळाला.
       मालदीवचा सर्वोच्च सन्मान, 'निशान इज्जुद्दीनचा नियम', मिळाला.
UAE चा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'ऑर्डर ऑफ झायेद' हा दोन राष्ट्रांमधील द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांची दखल घेऊन मिळाला.
बहरीन चा किंग हमाद ऑर्डर ऑफ द रिनेसान्स प्राप्त झाला.
       पॅलेस्टाईन चा 'ग्रँड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन' ने सन्मानित करण्यात आले. 
अफगाणिस्तान चा सर्वोच्च सन्मान अमीर अमानुल्ला खान पुरस्काराने सन्मानित केले. 
       सौदी अरेबिया चा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान, राजा अब्दुलाझीझ साशने सन्मानित करण्यात आले.
संयुक्त राष्ट्रांनी दिलेला सर्वोच्च पर्यावरण पुरस्कार.
जगातील आठ देशासह संयुक्त राष्ट्र संघाचा पुरस्कार मिळालेलं एक मेव नेतृत्व म्हणजे विश्वगुरु पंतप्रधान नरेंद्रजी मोदी ...
       पंतप्रधान मा नरेंद्र मोदीजी ह्यांना वाढदिवसाच्या निमित्त लाख लाख शुभेच्छा त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

शब्दांकन:- भाऊसाहेब वाकचौरे पाटील
जिल्हा संयोजक, भाजपा सोशल मीडिया, उत्तर नगर
close