श्रीरामपुर / प्रतिनिधी:
तालुक्यातील निपाणी वडगाव - अशोकनगर येथील अंगणवाडी क्र ३२१ या ठिकाणी वृक्ष संवर्धन तसेच वृक्षारोपण मोहिम संपन्न यावेळी अंगणवाडी सेविका सौ. मंगल काळे तसेच मदतनिस सौ.शकुंतला पिंगळे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. येथील ग्रामपंचायत सदस्या सौ. मंगल भागचंद नवगिरे यांच्या शुभहस्ते वृक्षारोपन करण्यात आले.
प्रसंगी सौ. नवगिरे यांनी वृक्ष संवर्धन ही काळाची गरज असुन परीसरात आपण सामाजीक बांधिलकी मधुन मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपन करणार असल्याची माहिती दिली. यावेळी सौ. मनिषा नवगिरे, श्रीमती इंदुबाई अडसुळ आदी उपस्थित होत्या. आभार सौ. मंगल काळे यांनी मानले.
पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव
संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस श्रीरामपूर -९५६११७४१११