shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

हरिगाव मतमाउली यात्रेचाशुभारंभ ध्वजारोहणाने संपन्न


श्रीरामपूर / प्रतिनिधी:
राज्यासह संपूर्ण देशात प्रख्यात असलेली श्रीरामपूर तालुक्यातील संत तेरेजा चर्च हरिगांव येथील मतमाउली यात्रा ७६ व्या यात्रा महोत्सवाचा शुभारंभ दि. ४ सप्टे.रोजी नासिक धर्मप्रांत सेवानिवृत्त महागुरूस्वामी लूरडस डानियल यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहणाने संपन्न झाला.त्या आधी हरिगावातून  मतमाउलीच्या मूर्तीची रथातून महागुरूस्वामी लूरडस डानियल व प्रमुख धर्मगुरू डॉमनिक रोझारिओ समवेत भव्य मिरवणूक काढण्यात आली. रथाचे सर्वत्र पूजन व स्वागत करण्यात आले.

 त्यानंतर डोंगरासमोर महागुरुस्वामी यांनी पवित्र मिस्सा प्रसंगी पवित्र मरिया यांच्या जीवनाबद्दल महिमा वर्णन केला.त्यावेळी फा.डॉमनिक रोझारिओ, फा,फ्रान्सिस ओहोळ.फा संतान रॉड्रीग्ज सहभागी होते.या पूर्वी ६ जुलै पासून दर शनिवारी असे नऊ शनिवार नोव्हेना भक्ती झाली.आज दिनांक ५ सप्टे,पासून यात्रेपर्यंत रोज सायंकाळी नोव्हेना होईल.५ सप्टे.रोजी देवाच्या योजनेतील तारण दायीत्वाची माता या विषयावर रा रे डॉ. बिशप अम्ब्रोस रिबेलो यांचे प्रवचन झाले आहे.दि. ६ रोजी फा आनंद गायकवाड- दिनाच्या कैवारिणीपवित्र मारिया,दि. ७ फा.पराकाष भालेराव-धन्य माता पवित्र मरिया,बिशप रा रे डॉ बर्नाड लांसी पिंटो-आई मारिया देवाची देणगी,दि. ९ फा अजय डीमोंटे-पवित्र मरीयेचा निश्कलक गर्भ संभव, दि. १० फा अक्षय आढाव-कृपादायीनी पवित्र मरिया, दि.११ फा.संजय पारखे - दु:खितांच्या सांत्वना पवित्र मारिया,दि. १२ फा. इग्नेशियस क्षीरसागर-जगत जननी पवित्र मारिया,दि. १३ सप्टे.रोजी फा प्रमोद मकासरे- पवित्र मारिया स्वर्गाचा दरवाजा या विषयावर प्रवचन करतील.

   शनिवार दि. १४ सप्टे. रोजी मतमाउली यात्रा ७६ वा.महोत्सव साजरा होईल त्यावेळी सकाळी ८.३० वा.पवित्र जपमाळ,नोव्हेना व विधिवत प.मारिया मूर्तीच्या शिरावर मुकुट चढविला जाईल व दर्शन रांगेने प्रारंभ होईल. सायंकाळी ४.३० वाजता महागुरुस्वामी रा रे डॉ. बार्थोल बरेटो यांचे मुख्य प्रवचन होईल यात्रा सांगता प्रसंगी दि १५ सप्टे. रोजी. सकाळी ७.३० वा.रेक्टर पुणे फा.भाऊसाहेब संसारे यांचे प्रवचन होईल.सर्व कार्यक्रमास भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रमुख धर्मगुरू डॉमनिक रोझारिओ व सहकारी धर्मगुरू यांनी केले आहे.

*वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगाव 
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
close