एरंडोल -- सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले निर्मित सत्यशोधक समाज स्थापना २४ सप्टेंबर १८७३ रोजी करण्यात आली.
या घटनेचे स्मरण म्हणून सत्यशोधक प्रल्हाद महाजन व परिवाराकडून "सत्यशोधक समाज स्थापना दिवस" मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महात्मा ज्योतिराव फुले यांना आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून गौरविण्यात येते. त्यांनी छत्रपती शिवरायांना गुरुस्थानी मानून शूद्र - अतिशूद्र व स्त्रियांसाठी शिक्षण सुरू केले. सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले यांना आदर्श मानून छत्रपती शाहूजी महाराज, सयाजीराव गायकवाड महाराज, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, राष्ट्रसंत गाडगे महाराज या सर्व महापुरुषांनी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक जनजागृती केली. त्यामुळे आधुनिक लोकशाहीभिमुख भारत देशाची निर्मिती झाली परिणामी आपल्या सर्वांना शिक्षण व इतर हक्क अधिकार मिळालेत.