लोयोला सदन येथे शिक्षकांचा
सन्मान सोहळा संपन्न
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
शहरातील संत लोयोला सदन चर्च येथे शिक्षक दिनाचे औचित्य साधून ज्ञानसेवेचे पवित्र कार्य करणाऱ्या धर्मग्रामातील ५० पेक्षा अधिक विद्यमान व सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान सोहळा धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू फा. प्रकाश भालेराव व फा. अनिल चक्रनारायण यांच्या हस्ते नुकताच पार पडला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन रवि त्रिभुवन यांनी केले.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना फादर भालेराव म्हणाले की, आई-वडिलांनंतर शिक्षक हे आपले आयुष्य घडवीत असतात. अज्ञानातून ज्ञानाकडे, अंधारातून प्रकाशाकडे नेत आपला सर्वांगीण विकास साधीत असतात. कुटुंब, नातीगोती सर्व जबाबदाऱ्या सांभाळून शिक्षण सेवेला न्याय देत असतात. त्यामुळे ते नेहमीच सन्मानास पात्र आहेत. ज्या देशात राष्ट्र निर्मात्या शिक्षकांचा सन्मान केला जातो तो देश प्रगतीपथावर गेल्याशिवाय राहत नाही, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
सदर सोहळ्यास प्रमुख धर्मगुरू फादर प्रकाश भालेराव,लोयोला दिव्यवाणीचे डायरेक्टर फा. अनिल चक्रनारायण, सेंट झेवियर्स टेक्निकलचे डायरेक्टर फा.संपत भोसले, सेंट झेवियर्स हायस्कूलचे प्राचार्य फा. विक्रम शिणगारे, यांच्यासह शिक्षक आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रंजीत लोखंडे, कमलाकर पंडित, डॉ. विजय त्रिभुवन, रवि त्रिभुवन व चर्च संलग्न सर्व संघटनांनी विशेष परिश्रम घेतले.
*वृत्त विशेष सहयोग
रवि त्रिभुवन (सर) श्रीरामपूर
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११