इंदापूर (पळसदेव) ५ सप्टें-(ता .इंदापूर) येथील गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एल.जी. बनसुडे विद्यालयामध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गुरु शिवाय जीवन अधुरे आहे गुरूंनी दाखवलेला मार्गच आपल्या यशाकडे नेतो यामुळे शिक्षकांना त्यांनी केलेल्या कार्यासाठी व शिक्षकां मध्ये उत्साह व प्रेरणा निर्माण करण्यासाठी हा उपक्रम घेण्यात आला अशी माहिती संस्थेच्या प्राचार्या वंदना बनसुडे व मुख्याध्यापक राहुल वायसे यांनी दिली. यामध्ये
प्रेरणादायी अवॉर्ड, पालक व विद्यार्थी सहसंबंध, ऑल राऊंडर, कर्तव्यदक्ष, संयमशील , काळजीवाहक, मैत्रीपूर्ण संबंध अशा विविध शीर्षकांनी शिक्षकांना अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले. संस्थेतील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शिक्षकांना प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा , वाहन चालक मालक यांचे देखील गुलाब पुष्प देऊन मानसन्मान करण्यात आला. शिक्षक दिनाच्या निमित्ताने इयत्ता १२वी,७वी व ८वीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिका साकारल्या. इयत्ता बारावी मधील वैष्णवी गुणवरे व अथर्व मोठे यांनी प्राचार्य व मुख्याध्यापकांची भूमिका बजावली.संस्थेचे उपाध्यक्ष आ. डॉ. शितल कुमार शहा यांच्या वाढदिवसाचे देखील साजरीकरण करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष आ. हनुमंत बनसुडे, कार्याध्यक्षा नंदाताई बनसुडे यांची उपस्थिती लाभली. विद्यार्थ्यांनी भाषण, कविता, गाणं यांच्या माध्यमातून शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बारावीची विद्यार्थिनी दिशा नगरे हिने केले. सर्व विभाग प्रमुख, सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत हसत खेळत पार पडला.