प्रतिनिधी पिंपळे:- चिमनपुरी पिंपळे येथील गणेशोत्सवानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे आयोजन लोकनियुक्त सरपंच सौ वर्षा युवराज पाटील व सामाजिक कार्यकर्ते युवराज डी पाटील यांनी गणपतीची आरती करून स्पर्धांना सुरुवात केली या स्पर्धेमध्ये बालगोपालांपासून प्रौढमंडळींनी देखील सह भाग घेतला.
विविध स्पर्धांमध्ये रांगोळी स्पर्धा, लिंबू चमचा स्पर्धा, संगीत खुर्ची, चित्रकला स्पर्धा, तसेच हंडी फोडणे निबंध स्पर्धा अशा विविध स्पर्धांनी उत्सवाचे औचित्य वाढवून आनंदाची भर घातली. या कार्यक्रमाचे आयोजन ग्रुप ग्रामपंचायत सर्व सदस्य व ओम साई क्लासेस चे संचालक श्री ज्ञानेश्वर पाटील सर सर्व सहकाऱ्यांनी केले होते विशेष करून जयवंत दगा पाटील, गोकुळ चुडामन पाटील, निंबा दयाराम चौधरी, पुरुषोत्तम लोटन चौधरी, गोविंदा चौधरी यांच्यासह सर्व सर्व ग्रामस्थ ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी व माता भगिनींचे सहकार्य लाभले.