प्रति पद्मालयाची साकारली प्रतिकृती...
प्रतिनिधी :-प्रमोद चौधरी
एरंडोल : पुणे येथील श्रीमंत.दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर हे गणेशाला समर्पित असलेले पुण्यातील एक हिंदू मंदिर आहे.(Pune Dagdusheth Halwai Ganpati)अनेक गणेशभक्त या गजाननाचे दर्शन घेण्यासाठी आवर्जून जातात. मात्र एरंडोल येथील मारवाडी गल्लीत (Dagdusheth devare)दगडूशेठ देवरे यांनी गणेशोत्सवात पद्मालयाच्या (padmalaya) श्री.गणेशमूर्तीच्या प्रतिकृतीची स्थापना करण्याची संकल्पना राबविली. त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र महेश देवरे व भावंडांनी ही परंपरा कायम जोपासली आहे. या बंधूंनी पद्मालय येथील डाव्या व उजव्या सोंडेच्या गणपतीचीच्या मूर्तीची गणेशोत्सवा निमित्त प्राणप्रतिष्ठा केली आहे.
पद्मालय येथील देवालयासारखी आरास उभारून खरोखरची घंटासुद्धा लावण्यात आली आहे. दररोज सकाळी व संध्याकाळी आरतीच्या वेळी घंटानाद केला जातो. त्यामुळे पद्मालयाचा आभास निर्माण होतो. गेल्या 9 वर्षांपासून पद्मालयाच्या प्रतिकृतीचा देखावा साकारण्यात येत आहे. याठिकाणी दर्शनासाठी विशेषतःआरतीच्या वेळी गर्दी होत असते हे शेवटचे वर्ष आहे,अशी माहिती सौ.कल्पना किशोर देवरे यांनी दिली.