प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. ९ / करमाळा चेस असोसिएशनच्या खेळाडूंनी ग्रँडमास्टर चेस अकॅडमी व सोलापूर चेस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनच्या मान्यतेने सोलापूर येथे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. सिद्धी पृथ्वीराज देशमुख हिने उत्कृष्ठ कामगिरी करत १३ वर्षाखालील मुलींच्या वयोगटात प्रथम क्रमांक, दहा वर्षीय देवराज सतीश कन्हेरे यानेदेखील चांगला खेळ करत १३ वर्षाखालील मुलांच्या गटात तृतीय क्रमांक तसेच अंश दुर्गेश राठोड याने पाचवा क्रमांक प्राप्त केला. विजयी सर्व खेळाडूंना करमाळा चेस असोसिएशनचे प्रा. नागेश माने सर, सचिन साखरे, मुकुंद साळुंके सर, शंभूराजे मेरूकर, सचिन दळवी सर, विजय दळवाले, अमोल राठोड यांनी मार्गदर्शन केले.
सोलापूरचे राष्ट्रीय प्रशिक्षक तसेच आंतरराष्ट्रीय पंच सुमुख गायकवाड सर, ग्रँडमास्टर चेस अकॅडमी सोलापूरचे प्रशिक्षक गणेश मस्कले सर, आंतरराष्ट्रीय पंच उदय वगरे, करमाळा चेस असोसिएशनचे अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यातून ग्रँडमास्टर खेळाडू घडवण्याचे ध्येय ठेवले आहे. त्याचा निश्चितच फायदा
करमाळ्यातील खेळाडूंना होणार असून सर्वांचे मार्गदर्शन मोलाचे ठरणार आहे. विजेत्या खेळाडूंचे करमाळा तालुक्यातील मान्यवरांकडून तसेच सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनचे अध्यक्ष खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन केले.