जून्नर प्रतिनिधी:-
ऋषिकेश परिवार संस्था आयोजक संयोजक शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ, रोटरी क्लब व लायन्स क्लब, शास्वत ट्रस्ट, जुन्नर, चैतन्य संस्था, उमेद अभियान, पं. स. जुन्नर, कल्याण आश्रम, एकलं विद्यालय, कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव, क्रांतीदिप अकोले, आय सी आय सी आय फाउंडेशन, डिसेंट फाउंडेशन व वन विभाग जुन्नर, यांच्या विषेश सहकार्याने एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालय घोडेगाव, कृषी विभाग(आत्मा) जुन्नर तालुका, समस्त ग्रामस्त व ग्रामपंचायत घाटघर प्रमुख ऋषिकेश परिवार ग्रुप यांनी रानभाजी महोत्सव नाणेघाट 2024 येथे आयोजित केले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा प्रदिप बा. देसाई(प्रकल्प अधिकारी घोडेगाव) मा. राजकुमार हिवाळे(प्रकल्प अधिकारी शहापूर) होते. मा विनायक बनसोड मॅडम(कार्यकारी व्यवस्थापक नाशिक) तसेच मा अशोक किरनळ्ळी (कृषी संचालक(आत्मा) यांचे हस्ते उदघाटन करण्यात आले. त्याचप्रमाणे मा नरहरी झिरवळ(उपाध्यक्ष, विधानसभा) मा आशाताई बुचके(सदश्या नियोजन स. पुणे) मा बाळासाहेब लोहकरे(वि.का.सदश्य) मा मधुकर काटे(आदिवासी महामंडळ नाशिक) मा सत्यशिल शेरकर(चेअरमन साखर कारखाना) प्रामुख्याने उपस्थिती दर्शविली वरील या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुरेश जोशी यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचा व पाहण्याचा यथोचित सत्कार करण्यात आले तसेच कार्यक्रमाच्या सुरूवातीस ग्रामीण भागातील वाद्यवृंद व गायक यांनी सुंदर अशी गाणी गायली की सर्वाचे लक्ष वेधून घेत होते त्याचप्रमाणे लेझिम पथक यांनी तर आगळ्या नी वेगळ्या पध्दतीने पुरूष /महिला लेझिम पथक कार्यक्रमाचे आकर्षण ठरले तर प्रस्तावना मा तुकाराम रावते यांनी संपुर्ण कार्यक्रमाचा आढावा घेताना अचुक माहिती देताना सर्व व्यासपीठावरील अधिकारी यांचे लक्ष वेधून घेत होते आदिवासी भागातील रानभाजीचे स्टाॅल लागले होते ते कुठेही पहायला मिळणार नाही एक महत्वाचे ठिकाण ठरले आहे विषेश औषधी वनस्पतीचे स्टाॅल काहींना तर विनामुल्य सल्ला देत होते होय जुन्नर तालुका अधिकारी, नाशिक जिल्हा अधिकारी, अकोले आंबेगाव तालुक्यातील अधिकारी वरील काय्रक्रमात हजेरी लावली यावरून रानभाजी महोत्सवाचे महत्व कळून आले रानभाजी महोत्सव नाणेघाट याठिकाणी ऋषिकेश परिवार विश्वस्त मा तुकाराम रावते यांचे हस्ते डॉ ख र माळवे (महाराष्ट्र राज्य पर्यटन व कला सांस्कृतिक महोत्सव समिती उपाध्यक्ष) यांचा सत्कार करण्यात आला.